लोक साधारणपणे घरात स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करतात (Gas Stove). गॅस शेगडीमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. काही शेगडीमध्ये २ बर्नर असतात, तर काहींमध्ये ३ किंवा ४ असतात (Induction). सध्या इंडक्शन कुकटॉपचा जमाना आहे. बऱ्याच घरांमध्ये इंडक्शन कुकटॉप आढळते. मुख्य म्हणजे दोन्हींमध्ये स्वयंपाक करता येतो (Kitchen Tips). पण मग असा प्रश्न निर्माण होतो की, गॅस स्टोव्हचा वापर करावा की, इंडक्शन कुकटॉपमध्ये जेवण शिजवावे?
गॅस आणि इंडक्शनमध्ये तुलना केल्यास, स्वयंपाक करण्यासाठी अधिक फायदेशीर आणि किफायतशीर काय असेल? गॅस आणि इंडक्शनमध्ये नेमका फरक काय? कशामध्ये स्वयंपाक केल्याने पैश्याची बचत होते? पाहूयात(Gas vs. Induction Cooking: What's Better?).
गॅस आणि इंडक्शनमध्ये फरक काय?
वर्षानुवर्षांपासून आपण गॅस स्टोव्हचा वापर करीत आलो आहोत. भारतातील बहुतांश घरात गॅस स्टोव्ह आढळते. गॅस स्टोव्हचे अनेक फायदे आहेत. गॅस स्टोव्ह सिलेंडरवर चालते. तर, गॅस इंडक्शन कुकटॉप विजेवर चालते. याला सिलेंडरची गरज भासत नाही. दोघांचे आपआपले फायदे आणि तोटे आहेत.
उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी
गॅस स्टोव्हचे फायदे
प्रत्येक भारतीय गॅस स्टोव्हचा वापर करतो. गॅस स्टोव्हमध्ये स्वयंपाक करणं सोप्पं जातं. यासाठी विजेची गरज भासत नाही. आपण यावर कोणत्याही भांड्यात पदार्थ शिजवू शकता. शिवाय बर्नरवर थेट चपाती किंवा खोबरं, कांदे, इतर भाज्या भाजू शकता. गॅसमध्ये दोन ते चार बर्नर असतात. आपण सोयीनुसार बर्नरच्या संख्येसह गॅस खरेदी करू शकता. यामुळे स्वयंपाक करणे सोपे होते आणि कमी वेळ लागतो.
रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, १ वाटीचे प्रमाण - पाहा परफेक्ट रेसिपी
गॅस स्टोव्हचे तोटे
गॅसवर अन्न शिजवताना आजूबाजूचे वातावरण गरम होते. यामुळे खोली उबदार राहते. शिवाय गॅस स्टोव्ह हानिकारक मानले जाते. त्यातून निर्माण होणाऱ्या आगीमुळे जळण्याचा धोका अधिक असतो. शिवाय बऱ्याचदा सिलेंडर फुटण्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे गॅसचा वापर काळजीपूर्वक करावा.
इंडक्शन कुकटॉपचे फायदे
इंडक्शन कुकटॉपचे फायदे अनेक आहेत. याचा वापर करण्यासाठी विजेची गरज असते. यावर तापमान नियंत्रित करण्याचे पर्याय आहेत. त्यामुळे खोलीतील वातावरण अजिबात गरम होत नाही. मुख्य म्हणजे यात जळण्याचा धोका नाही.
इंडक्शन कुकटॉपचे तोटे
इंडक्शन कुकटॉपवर विविध प्रकारच्या भांड्याचा वापर करता येऊ शकत नाही. यावर सपाट पृष्ठभागाच्या भांड्याचा वापर करता येऊ शकते. जसे की इंडक्शन बेस आणि नॉन-स्टील, ही भांडी महाग असतात. चपाती किंवा भाकरी इंडक्शनमध्ये तयार होऊ शकणार नाही. शिवाय अधिक वापरामुळे वीजबिल जास्त येऊ शकते.