गणपती येऊन विराजमान झालेले आहेतच. आता लवकरच घरोघरी महालक्ष्मीचेही आगमन होणार आहे (Gauri-Ganapati Festival 2024). काही ठिकाणी त्यांना गौरी तर काही ठिकाणी ज्येष्ठागौरी म्हणूनही ओळखलं जातं. गौरी- गणपतीचा हा सण मोठाच खास आणि कलात्मकतेने पुरेपूर भरलेला. गौरीला साड्या नेसवणे, त्यांना छान वेगवेगळे दागिने घालून तयार करणे हे खूपच सुंदर काम. पण अनेक जणींना गौरींना साडी नेसवणं खूप कठीण वाटतं. तुम्हालाही तसेच वाटत असेल तर ही एक सोपी ट्रिक बघा. साडी नेसविण्याचं अवघड काम एकदम सोपं वाटू लागेल.(gaurina saree kashi nesavavi in marathi)
Image Credit- Google
गौरीला किंवा महालक्ष्मीला साडी कशी नेसवावी?
गौरीला साडी नेसविण्यासाठी काही जणींना अगदी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो्. पण तरीसुद्धा मनाप्रमाणे साडी नेसवली गेली असं त्यांना वाटत नाही. त्यासाठीच आता ही एक सोपी पद्धत पाहा.
पांढरे कपडे पिवळे पडले? 'हा' पदार्थ वापरून धुवा- जुने, पिवळट कपडेही होतील नव्यासारखे चमकदार
महालक्ष्मीसाठी तुमच्याकडे कोठ्या असतील तर साडीच्या नेसत्या टोकापासून ते पदराच्या अलीकडच्या भागापर्यंत एकसारख्या निऱ्या घाला. त्या निऱ्या गौरीच्या समोरच्या बाजुने कोठीमध्ये खोचून घ्या. जर कोठीला धड अटॅच असेल तर गौरीचा साधारण पोटाजवळचा जो भाग येईल तिथे एक दोरी बांधा आणि त्या दोरीत निऱ्या खोचा. यानंतर नेसत्या बाजुने म्हणजेच डावीकडून निरीचे एक टोक अलगद मागे ओढा आणि गौरीच्या मागच्या बाजूला सरकवा.
आता पदर पिनअप कसा करायचा ते बघा. गौरीच्या साडीचा पदर छोटा असावा तसेच निऱ्या लहान घालाव्या. यानंतर पदर गौरीच्या मागच्या बाजूने घेऊन समोरून डाव्या खांद्यावर सोडा आणि तो पिनअप करून टाका.
कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब
पदराला पिन लावताना पदराचा आतला थोडा मोकळा सोडावा तो पिनअप करू नका. कारण गौरीचा मुखवटा बसवल्यानंतर आपण हा पदर अगदी अलगद त्यांच्या डोक्यावरून घेऊ शकतो. यानंतर खालच्या निऱ्या एकसारख्या केल्या की साड्या नेसून गौरी झाल्या तयार....