Lokmat Sakhi >Social Viral > Gay Couple Marriage : प्यार किया तो डरना क्या! कोलकात्यात गे कपलने केलं लग्न, फोटो व्हायरल

Gay Couple Marriage : प्यार किया तो डरना क्या! कोलकात्यात गे कपलने केलं लग्न, फोटो व्हायरल

Gay Couple Marriage : कोलकात्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे लग्न पार पडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 01:01 PM2022-07-05T13:01:40+5:302022-07-05T13:13:13+5:30

Gay Couple Marriage : कोलकात्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे लग्न पार पडले.

Gay Couple Marriage : Gay couple ties the knot in a traditional ceremony in kolkata | Gay Couple Marriage : प्यार किया तो डरना क्या! कोलकात्यात गे कपलने केलं लग्न, फोटो व्हायरल

Gay Couple Marriage : प्यार किया तो डरना क्या! कोलकात्यात गे कपलने केलं लग्न, फोटो व्हायरल

कोलकात्यामध्ये एका समलिंगी (Gay couple) जोडप्याने लग्नगाठ बांधली. या लग्नाला त्यांचे जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय उपस्थित होते. अभिषेक रे आणि चैतन्य शर्मा या दोन पुरूषांचा खास सोहळ्यात विवाह झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिषेक रे हे कोलकातास्थित डिझायनर आहेत. त्याने आपला खास मित्र चैतन्य शर्मासोबत लग्न केले. कोलकात्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे लग्न पार पडले. (Gay couple ties the knot in a traditional ceremony)

या लग्नात संगीत सोहळ्यापासून हळद, मेहंदीपर्यंतचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले. दोन्ही कुटुंब एकत्र होते आणि त्यांनी आनंदाने जोडप्याला आशीर्वाद दिला. गे कपलच्या हळदी आणि लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. अभिषेकने पारंपारिक बंगाली वर म्हणून धोती आणि कुर्ता घातला होता, तर चैतन्यने शेरवानी घातली होती. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (Gay Couple in Kolkata Pulls Out All Stops in Grand Wedding Ceremony)

चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. सोशल मीडियावर लोक या जोडप्याचे जोरदार अभिनंदन करत आहेत. दोघांचा आनंद फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.

भारतातील पहिला समलिंगी विवाह 2017 मध्ये झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हैदराबादमध्ये एका समलिंगी जोडप्याने लग्नगाठ बांधली. सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी आधी साखरपुडा केला होता आणि हैदराबादच्या रिसॉर्टमध्ये गाठ बांधली. 

Web Title: Gay Couple Marriage : Gay couple ties the knot in a traditional ceremony in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.