आपल्याकडे लैला - मजनू, हिर रांझा यांची नाव घेऊन त्यांच्या अमर प्रेमाचे दाखले दिले जातात. असं म्हणतात प्रेमात माणूस वेडा होतो, आजूबाजूचे जग विसरतो, इतकंच काय तर स्वतःला देखील विसरतो. एखाद्यावर प्रेम करताना आपण किती वाहवत जातो. कधी काही जण प्रेमात टॅटू काढतात तर काहीजण प्रेमामध्ये स्वतःला इतके झोकून देतात की काय योग्य आणि काय अयोग्य याबाबत त्यांना कळतच नाही. अशीच काहीशी एक घटना सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. जर्मनीमधील मॉडेल असणाऱ्या थेरेसिया फिशरने आपल्या पतीसाठी ऑपरेशन करत चक्क स्वतःची उंची वाढवली आहे. परंतु आता तिला या गोष्टीचा त्रास होतोय कारण त्यानंतर तिचा घटस्फोट झालाय. नात्यात कुठपर्यंत आपण जायला हवे याचा कुठेतरी विचार करायला हवा.
मॉडेल(German Model)असणाऱ्या थेरेसिया फिशर (Theresia Fischer) या मॉडेलची उंची ५ फूट ६ इंच होती. मात्र पतीला उंच मुली आवडतात म्हणून तिने अत्यंत कठीण ऑपरेशनचा सामना करत आपली उंची ५ इंच अधिक वाढवून घेतली आणि ६ फूट केली. या ऑपरेशनसाठी तिने १ कोटी ३४ लाख रूपये खर्च केल्याचे तिने स्वतःच आपल्या सोशल मीडियावर सांगितले आहे. या गोष्टीचा तिला आता पश्चात्ताप होतो(German Model Expresses Regret After Spending Rs 1.33 Crore To Extend Legs By 5.5 Inches).
नक्की तिने नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं तरी काय...
डेलिमेलच्या वृत्तानुसार, थेरेसिया फिशर नावाच्या मॉडेलने आपल्या पतीच्या आवडीनुसार, त्याच्या प्रेमासाठी स्वतःची उंची ऑपरेशनद्वारे वाढवून घेतली. ५ फूट ६ इंच असणाऱ्या थेरेसियाने उंची ६ फूट करून घेतली. यासाठी तिला अत्यंत कठीण ऑपरेशन करावे लागले होते. इतकंच नाही तर करोड रूपये खर्चून तिने आपल्या प्रेमाची किंमत मोजली असल्याचे म्हटलं आहे.
गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..
आता तिला पश्चाताप का होतोय...
ऑपरेशननंतर थेरेसियाची उंची तर वाढली मात्र तिला आता पश्चात्ताप होतोय कारण तिने अशा माणसासाठी स्वतःचं ऑपरेशन करून घेतलं ज्याच्यासह ती रहातच नाही आणि तिचा घटस्फोट झालाय. तिच्या एक्स पतीच्या आवडीसाठी तिने हे पाऊल उचललं होतं. रेडिओ नेटवर्क MDR जंपसह बोलताना तिने हा पश्चात्ताप व्यक्त केला. आपल्या पतीला उंच मुली आवडत असल्यामुळे आपण हे केले असंही तिने सांगितले.
स्वतःच्या या ऑपरेशनवर खूष...
आपल्या पतीसाठी हे केले यासाठी मला नक्कीच पश्चात्ताप आहे कारण अशा ऑपरेशनसाठी मी परवानगी देणे योग्य नव्हते असं मत तिने मांडले. तर सोशल मीडियावर येणाऱ्या निगेटिव्ह कमेंट्समुळेही आपल्याला त्रास झाला असल्याचे तिने सांगितले. ट्रोल करतात याचे दुःख होते. मात्र मी इतकी उंच आहे याबाबत मी संतुष्ट आहे असंही तिने सांगितले.
घसघशीत पगार, कार्पोरेट जॉब, ब्राइट करिअर ‘तिनं’ सोडलं आणि.. करिअरचं वाटोळं झालं की भलं?
प्रेमात कुठे थांबावे हे समजले पाहिजे...
प्रेम ही अत्यंत सुखद भावना आहे. मात्र आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीचा कोणता हट्ट पुरवायचा अथवा आपण प्रेमात किती वहावत जायचे हे सर्वस्वी आपल्या मनावर अवलंबून असते. प्रत्येक मुलगा वा मुलीला आपण नक्की काय करतोय याची जाणीव असायला हवी. समोरच्याचे मन दुखावले जाऊ नये ही भावना जरी असली तरी प्रेमात कुठे थांबावे हे प्रत्येकाला कळायला हवे.
प्रेमात स्वतःला त्रास करून घेऊ नये...
प्रेमात सर्वात जास्त त्रास हा तुम्ही स्वतःला देत असता हे नेहमी लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या होणाऱ्या अथवा झालेल्या जोडीदारासाठी आपण कुठपर्यंत आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करतोय अथवा आपल्या मनाविरूद्ध जाऊन नक्की काय करतोय याचा विचार नक्कीच व्हायला हवा. कारण यातून आपण स्वतःला जास्त दुखावत असतो आणि जगताना हे करणं योग्य नाही. थेरेसियाने उचललेल्या पावलाप्रमाणे कृती करण्याआधी नीट विचार करावा.