दिवाळी (Diwali 2024) म्हटलं की रोषणाई. घराची साफसफाई आणि सर्वच गोष्टीला नवलाई (Cleaning Tips). दिवाळीच्या आधीच आपण घराला चकचकाट करतो. नवनवीन गोष्टी घेऊन घराला सजवतो. दिवाळीच्या खास प्रसंगी घर अगदी नव्यासारखं दिसतं. बेडशीट नवे, फर्निचर नवे. शिवाय उंबरठ्यावर लावण्यात येणारी पट्टी देखील नवीनच असते.
घराच्या मुख्य दारावर शुभ लाभचं स्टिकर्स तर आपण लावतो. या स्टिकर्समुळे घर प्रसन्न राहते. लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपण उंबरठ्यावर डिझाईनर पट्टीही चिकटवतो. दाराबाहेर रांगोळी. दारावर शुभ लांब आणि उंबरठ्यावर डिझाईनर स्टीकर पाहून मन प्रसन्न होतं. यात काही वाद नाही. पण जर आपल्याला विविध प्रकारचे स्टिकर्स पहायचे असतील तर, एकदा इथे नजर टाका. नक्कीच या प्रकारचे स्टिकर्स पट्टी आपल्याला आवडतील( Get Latest Umbra patti sticker for the Special Occasion Diwali).
दिवाळी स्पेशल उंबरठ्यावर लावण्यात येणारे स्टिकर्स पट्टी
- सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे स्टिकर्स पट्टी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये व्हरायटी देखील पाहायला मिळते. आपण दिवाळी निमित्त दिवे आणि पावलांचे सुंदर स्टिकर्स खरेदी करू शकता.
फक्त ४ चमचे तेलात पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अगदी १५ मिनिटांत, दिवाळी स्पेशल चिवडा रेडी
- कोणाला पावलांचे नसून, रांगोळीचे डिझाईन आवडतात. रांगोळीचे डिझाईनचे स्टिकर्स बाजारात बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे.
- कळस आणि दिव्यांची सुंदर स्टिकर्स पट्टी आकर्षक दिसते. त्याच्या दोन्ही बाजूला पावलंही शोभूनही दिसतात. ज्यामुळे उंबरठ्याची शोभा वाढते.
- सध्या मोर देखील ट्रेण्डमध्ये आहे. दिवाळीनिमित्त मोराची नाजूक रांगोळी हमखास काढली जाते. स्टिकर्समध्ये द्केहील मोर पाहायला मिळतो. मोराच्या मधोमध दिवे हे फार आकर्षक दिसतात.
मुलं रात्री लवकर झोपत नाहीत? दंगा करतात? आईबाबांसाठी ५ टिप्स; मुले झोपतील शांत
- ऐरावत आणि त्याच्या बाजूला कळस ही स्टीकर पट्टी देखील आपल्याला नक्कीच आवडेल.