Join us

वाळवणाची तयारी करताय, पण उन्हात स्वतःची काळजी कशी घ्याल, उष्माघात टाळा - आजच ७ गोष्टी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 11:25 IST

get ready for the summer, see how to take care of yourself in the heat : उन्हाळ्यासाठी आत्तापासूनच काळजी घ्यायला सुरूवात करा.

२०२४ मध्ये भारतामध्ये अवेळी पाऊसाने बऱ्याच ठिकाणी थैमान घातला. त्यानंतर अचानक उष्णताही फार वाढली होती. (get ready for the summer, see how to take care of yourself in the heat )सध्या अनेक ठिकाणी प्रचंड थंडी पडली. निसर्गचक्र जरा क्ररच होत चाललं आहे असं म्हणायला हरकत नाही. जागतिक हवामान संघटनेने(WMO) सांगितल्यानुसार, यंदा भारतातील उन्हाळा दरवर्षीपेक्षा जास्त उष्ण व कडक असणार आहे. (get ready for the summer, see how to take care of yourself in the heat )म्हणजेच येऊ घातलेला उन्हाळा चांगलेच चटके देणारा ठरेल असं दिसत आहे. उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी आत्तापासूनच लहान मोठी तयारी करून ठेवणे गरजेचे आहे.

१.विविध सरबतांचे अर्क तयार करून ठेवा. उन्हाळ्यात शरीराला डायड्रेटेड ठेवण्याचा मस्त मार्ग म्हणजे सरबत. चवीलाही मस्त आणि आरोग्यालाही. कोकम सरबत, आवळा सरबत, बडीशेप सरबत, वाळ्याचे सरबत तयार करून ठेवा. (get ready for the summer, see how to take care of yourself in the heat )

२. पातळ कॉटनचे कपडे वापरा. ते आत्ताच शिवून घ्या. किंवा विकत आणा. उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो. तो जाड कपड्यांमुळे शरीरावर साठून राहतो त्यामुळे विविध अँलर्जी होतात. त्वचा काचते. मांड्यांसारख्या भागांना जास्त त्रास होतो. पातळ कॉटनचे कपडे वापरल्याने हवा खेळती राहते. शरीराला हवा लागली की या समस्या उद्भवत नाहीत. 

३. बरोबर गोड पदार्थ ठेवा. उष्माघाताचा त्रास झाल्यास किंवा चक्कर आल्यास शरीरातील साखरेचे प्रमाणवर खाली होते. अशावेळी लहानशी लिमलेटची गोळी ही कामी येते. 

४. अंगावर पांघरायला पातळ चादर वापरा. रात्री झोपताना शरीराला हवा नीट मिळाली की त्वचेचे विकार उद्भवत नाहीत. 

५. उन्हाळ्यात भरपूर फळे खा. शरीराला पोषकसत्त्वे तसेच पाणी फळांमधून मिळते. 

६. वाळवणांची तयारी तुम्ही सुरू केलीच असेल. पापड, कुरडया तयार करण्याचे काम फार थकवते. राखणीसाठी दिसभर उन्हात बसू नका. त्याचा तुमच्या स्वास्थ्यावर फार वाईट परिणाम होतो.  

७. मुख्य म्हणजे सतत पाणी पित राहा. पाण्यात लिंबू पिळा . तुळस घाला. वाळा घाला. ते आणखी फायदेशीर ठरेल.

वाळवणं, विविध पदार्थ, लोणच्यांचे प्रकार तर तुम्ही नक्कीच तयार करणार आहात. पण या उन्हाळ्यात स्वत:ची काळजी घ्यायला विसरू नका.        

टॅग्स :समर स्पेशलउष्माघातकापूसमहिलाहेल्थ टिप्स