घरामध्ये फक्त माणसेच राहत नाहीत तर इतरही काही प्राणी आपल्या घरी बिन बुलाए मेहमान असल्या सारखे राहतात. त्यांना घरातून घालवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. (get rid of this insect on time or you will fall ill)उंदीर घरात असला की मग अन्नाची प्रचंड नासाडी करतो. रोगराई पसरवतो. तसेच घुस असते चिचुंद्री असते. घराच्या भिंतींवर पाल सरासरा फिरते. पाल घरात आली की एकटी येत नाही संपूर्ण परिवार घेऊन येते. मग सगळ्या पाली भिंतीवर चिकटलेल्या असतात. तसेच आणखी एक प्राणी किंवा कीटक म्हणजे झुरळ. ()get rid of this insect on time or you will fall illस्वयंपाकघरामध्ये अडचणीच्या ठिकाणी जाऊन ही झुरळे बसतात. पटकन ही झुरळे दिसत नाहीत. मात्र अन्ना जवळ फिरत असतात. त्यांच्यामुळे रोगराई पसरते.
तसेच डासांचा फार त्रास होतो. संध्याकाळ झाली की टोळीच्या टोळी खिडकी दरवाज्यांमधून घरात येते. अगदी लहानसे भोक जरी असेल तरी त्यातून आत येतात. मग नुसते कचाकच चावतात. डास चावतात म्हणून त्यांना घालवण्यासाठी आपण उपाय करतो. मात्र याच जमातीचा आणखी एक कीटक आहे जो चावत नाही त्याच्याकडे आपण फार लक्ष देत नाही. असा कीटक म्हणजे माशी. माशी फक्त आजूबाजूला फिरते. त्यामुळे ती आपल्याला हार्मलेस वाटते. मात्र तसे नसून माशी फार धोकादायक ठरते.
माशी अन्नावर फिरत असते. तसेच ती खाद्यपदार्थांवर बसते. आपल्याला वाटते ती ते खाण्यासाठी बसली आहे. मात्र माशीला दात नसतात. ती अन्न खात नाही. माशी शरीरातील द्रव्य त्या अन्नावर सोडते. तसेच शरीरातील घाण अन्नावर टाकते. ती फार लहान असल्याने आपल्याला ते दिसून येत नाही. मात्र निरखून पाहिल्यावर दिसू ही शकते. त्यामुळे माशी अन्नावर कधीच बसू देऊ नका. बराच वेळ अन्न उघडे राहिले असेल तर ते खाणे टाळाच.
माशीच्या शरीरातील त्या द्रवामुळे आजारपण येते. घसा खराब होतो. पोटाचे विकार होतात. त्यामुळे अन्न कायम झाकून ठेवायचे. स्वच्छता ठेवायची. स्वच्छ ठिकाणी माश्या शक्यतो येत नाहीत. जर शिळे कुजलेले पदार्थ असतील तरच माश्या येतात. घराच्या कोपऱ्यांमध्ये लवंग, तमालपत्र ठेवल्याने माश्या येत नाहीत. मसाल्यांचा वास त्यांना सहन होत नाही. तसेच रुमफ्रेशनर वापरा. माश्या घरात येणार नाहीत. अन्न कायम झाकून ठेवा.