Lokmat Sakhi >Social Viral > घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा

घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा

Ghat sthapana Pooja Preparation: पूजा सुरू केली की बऱ्याचदा हे विसरलं, ते विसररलं असं होऊन जातं... असं होऊ नये म्हणून या काही टिप्स लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 12:43 PM2023-10-14T12:43:44+5:302023-10-16T13:53:41+5:30

Ghat sthapana Pooja Preparation: पूजा सुरू केली की बऱ्याचदा हे विसरलं, ते विसररलं असं होऊन जातं... असं होऊ नये म्हणून या काही टिप्स लक्षात ठेवा.

Ghatsthapana pooja preparation, How to do preparation for navratri pooja? | घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा

घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा

Highlightsपूजेची तयारी करताना या काही गोष्टींची जमवाजमव आधीच करून ठेवा

घरात कोणतीही पूजा करायची असली तरी त्यासाठी भरपूर तयारी करावी लागते. त्यात घटस्थापनेची पूजा तर मोठीच असते. या पूजेची तयारी करताना काही गोष्टी घ्यायच्या राहून गेल्या तर ऐनवेळी खूपच धावपळ होते. सगळाच गोंधळ उडतो. असं होऊ नये म्हणून पूजेची तयारी करताना या काही गोष्टींची जमवाजमव आधीच करून ठेवा (Ghatsthapana Pooja Preparation). जेणेकरून काहीही विसरणार नाही आणि ऐनवेळी होणारी सगळीच पळापळ टळेल. यामुळे तुमचं कामही अगदी सोप्पं होऊन जाईल. (How to do preparation for navratri pooja?)

 

घटस्थापनेच्या पूजेची तयारी करण्यासाठी टिप्स

१. घटस्थापना करण्याआधी आपण देवघर आणि सगळे देव व्यवस्थित स्वच्छ करून ठेवतो. त्यामुळे स्वच्छ केलेल्या देवाच्या मुर्ती, मुर्तींच्या खाली टाकायचे आसन, असतील तर देवांचे काही दागिने, रांगोळीचा डबा, रंग असं सगळं देवघराजवळ आणून ठेवा.

दोन हजारांची महागडी साडी तुम्ही किती वेळा नेसता? - सुधा मुर्ती सांगतात बचतीचा सोपा मंत्र

देवघराचा लाईट व्यवस्थित लागतोय का, घटमाळ जिथे अडकविणार तो खिळा व्यवस्थित बसला आहे का हे सगळं पाहून ठेवा. जे पुजा करणार आहेत त्यांच्यासाठी आसन, हात पुसायला छाेटासा नॅपकिन असं सगळं एका जागी आणून ठेवा.

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

२. पूजेच्या ताटात कलश, नारळ, कलशामध्ये टाकायला पाणी, नाणी, सुपाऱ्या, धूप, धूपदाणी, किंवा उदबत्ती आणि उदबत्तीचे स्टॅण्ड, विड्याची पाने, शंख, घंटा, दोरे, हळद- कुंकू, अक्षदा, चंदन, अष्टगंध, देवीची मुर्ती, देवीचे वस्त्र, पळी, ताम्हण, अभिषेक पात्र, आरतीच्या वाती, आरतीचा दिवा, कापूर असं सगळं काढून ठेवा. नऊ दिवस जो दिवा लावणार तो व्यवस्थित घासून स्वच्छ करून त्यात वात घालून आणि तेल टाकून ठेवा.

 

३. पूजेसाठी फुलं काढून ठेवा तसेच काही फुलांच्या पाकळ्या करून ठेवा. घटात माळ सोडायची असेल तर ती आधीच करून ठेवा. घटाखाली ठेवायला ताट, त्यात टाकायची माती, मातीमध्ये टाकण्यासाठी आपापल्या घरातल्या परंपरेनुसार गहू किंवा पंचधान्य, पाच फळं किंवा केळी असं सगळं एका ताटात तयार ठेवा. 

गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल

४. प्रत्येक घरच्या परंपरेनुसार नैवेद्य वेगवेगळा दाखवला जातो. त्यामुळे तुमच्या घरची परंपरा जशी आहे, त्यानुसार नैवेद्याची तयारी करून ठेवा. 

 

Web Title: Ghatsthapana pooja preparation, How to do preparation for navratri pooja?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.