Lokmat Sakhi >Social Viral > ती सध्या काय करते ? काही सेकंदात पास्ता खाते ! तिचे खाणे इतके फास्ट, नाव थेट गिनिज बुकात...

ती सध्या काय करते ? काही सेकंदात पास्ता खाते ! तिचे खाणे इतके फास्ट, नाव थेट गिनिज बुकात...

girl ate pasta in the blink of an eye became world record indian shock : Leah Shatkever सर्वात जलद वेळेत पास्ता खाण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या महिलेचा ‘सुपरफास्ट’ खाण्याचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 07:44 PM2023-09-30T19:44:19+5:302023-09-30T19:57:40+5:30

girl ate pasta in the blink of an eye became world record indian shock : Leah Shatkever सर्वात जलद वेळेत पास्ता खाण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या महिलेचा ‘सुपरफास्ट’ खाण्याचा विक्रम

girl ate pasta in the blink of an eye became world record indian shock. | ती सध्या काय करते ? काही सेकंदात पास्ता खाते ! तिचे खाणे इतके फास्ट, नाव थेट गिनिज बुकात...

ती सध्या काय करते ? काही सेकंदात पास्ता खाते ! तिचे खाणे इतके फास्ट, नाव थेट गिनिज बुकात...

पास्ता, न्युडल्स हे असे पदार्थ आहेत की जे आपण सगळेच अगदी आवडीने खातो. घरांतील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पास्ता खायला फार आवडतो. पास्ता, न्युडल्स यांसारखे इन्स्टंट पदार्थ हे पॅकेट उघडले की झटपट तयार होऊन खाण्यासाठी रेडी असतात. आजकाल बाजारांत इन्स्टंट न्युडल्स, पास्ता यांचे पाकीट हमखास मिळते. बाजारांत विकत मिळणाऱ्या या पाकिटात फक्त गरम पाणी ओतले की लगेच २ ते ३ मिनिटांत पास्ता खाण्यासाठी तयार असतो. हे इन्स्टंट तयार होणारे पास्ता जितक्या लगेच बनतात तितक्याच झटपट ते फस्त देखील केले जातात(Champion speed eater Leah Shutkever).

जर आपल्यासमोर कुणी असा गरमागरम, क्रिमी इटालियन पास्ता आणून ठेवला तर तो तुम्ही किती वेळात फस्त कराल ? अशाच एका अजब - गजब पास्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) नोंद करण्यात आली आहे. पास्ता खाल्ल्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण होय हे खरं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण ? ते पाहूयात(girl ate pasta in the blink of an eye became world record indian shock).

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये पास्ता खाण्याचा अजब विक्रम... 

गेल्याच महिन्यात Leah Shatkever या ब्रिटीश महिलेने सर्वात कमी वेळेत पास्ता खाण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. अलीकडेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरुन तिच्या यशाचे चित्रीकरण करणारी एक छोटी क्लिप शेअर केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्सच्या  अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, Leah Shatkever ने ३ ऑगस्ट २०२३ रोजी लंडनमध्ये हा पास्ता खाण्याचा विक्रम केला होता. 

पापणी लवते न लवते तोच पास्ता गायब... 

Leah Shatkever ही ब्रिटीश महिला स्पीड इटिंगसाठी फारच लोकप्रिय आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्पीड इटिंगचे असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, Leah Shatkever एका डिशमध्ये ठेवलेला टोमॅटो सॉस बेस्ड पास्ता खाताना दिसत आहे. तिने हा डिशमधील पास्ता चक्क १७. ०३ सेकंदात फस्त केला आहे. तिने एकाच घासात डिशमधील सर्व पास्ता तोंडात घालत क्षणार्धात खाऊन संपविल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

दिया मिर्झाच्या रिसायकल मिडी ड्रेसची चर्चा, जुन्या कपड्यांतले धागे वापरुन कसा बनवला नवा ड्रेस...

याआधीसुद्धा तिच्या स्पीड इटिंगमुळे अनेक प्रकारचे अन्नपदार्थ खाण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. या आधी देखील ती तिच्या जलद गतीने खाण्यामुळे चर्चेत आली होती. तिने चक्क १ मिनिटांत ३५२ ग्रॅम नगेट्स खाल्ल्याचा विक्रम केला होता.     

सारा अली खानच्या रंगबिरंगी क्रोशेट टॉप आणि स्कर्टची चर्चा, हिप्पी फॅशनची अनोखी स्टाईल...

पॅरिस फॅशन वीकमध्ये घडले ‘असे’ काही, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती, स्कर्टवर पेटले दिवे आणि फुलपाखरांची तर...

तिने केलेले काही खास विक्रम... 

 Leah Shatkever हिने आत्तापर्यंत एक अख्खी काकडी २७. १६ सेकंदात खाऊन संपवली आहे. तसेच एका मिनिटात १० वेगवेगळ्या प्रकारचे सॉस देखील खाल्ले आहेत. तिने १ मिनिटात २० मार्शमेलो स्पॉंजी चॉकलेट, २१ . ९५ सेकंदात छोटे मफिन्स, १८ . १५ सेकंदात व्हेज हॉट डॉग व २० . ३३ सेकंदात केळी खाण्याचा विक्रम नोंदविला आहे.

Web Title: girl ate pasta in the blink of an eye became world record indian shock.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.