Lokmat Sakhi >Social Viral > तुम्हाला लव्हेरिया नाही पण 'लव्ह ब्रेन'चा आजार नक्की असेल, पाहा ही लक्षणे.. आजार गंभीर आहे..

तुम्हाला लव्हेरिया नाही पण 'लव्ह ब्रेन'चा आजार नक्की असेल, पाहा ही लक्षणे.. आजार गंभीर आहे..

Girl calls her boyfriend over 100 times a day, diagnosed with 'Love Brain' : प्रेम करा, पण आपल्याला धक्कादायक आजार जडतील इतकेही वेडेपिसे होऊ नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 02:42 PM2024-04-25T14:42:04+5:302024-04-25T22:13:11+5:30

Girl calls her boyfriend over 100 times a day, diagnosed with 'Love Brain' : प्रेम करा, पण आपल्याला धक्कादायक आजार जडतील इतकेही वेडेपिसे होऊ नका..

Girl calls her boyfriend over 100 times a day, diagnosed with 'Love Brain' | तुम्हाला लव्हेरिया नाही पण 'लव्ह ब्रेन'चा आजार नक्की असेल, पाहा ही लक्षणे.. आजार गंभीर आहे..

तुम्हाला लव्हेरिया नाही पण 'लव्ह ब्रेन'चा आजार नक्की असेल, पाहा ही लक्षणे.. आजार गंभीर आहे..

आतापर्यंत आपण प्रेमात वेडे, किंवा प्रेमात आंधळे झाल्याचं ऐकलं असेल (Social Viral). पण प्रेमाचा आजार होतो? हे कधी ऐकलं आहे का? आता तुम्ही म्हणाल प्रेमाचा आजार हा कसला नवीन प्रकार? तर, हा आजरा जडला आहे एका १८ वर्षीय मुलीला (Relationship). होय, किशोरवयीन मुलीने आपल्या बॉयफ्रेण्डसोबत असं काही केलं की, तिला 'लव्ह ब्रेन' नावाचा आजार झाला आहे. आपण मेंदूच्या निगडीत ब्रेन ट्यूमर, ब्रेन कॅन्सर, मेन्टल डिसऑर्डर आणि स्ट्रोकसारखे आजार ऐकले असतील. पण 'लव्ह ब्रेन' हा नेमका कोणत्या आजाराचा प्रकार आहे?

मुख्य म्हणजे या आजारात अल्पवयीन मुलगी म्हणे प्रियकराला दिवसभरात १०० कॉल्स लावायची. आत्महत्या करण्याच्या धमक्या द्यायची. मुलीने नक्की मुलासोबत असं का केलं? ज्यामुळे  तिला हा आजार जडला? पाहूयात(Girl calls her boyfriend over 100 times a day, diagnosed with 'Love Brain').

चीनमध्ये मुलीला झाला 'लव्ह ब्रेन'चा आजार

'लव्ह ब्रेन' हे नाव ऐकायला छान जरी वाटत असलं तरी, त्याचे तोटे अनेक आहेत. हा आजार ज्या मुलीला झाला, तिचं नाव शिओयू. ती रिलेशनशिपमध्ये होती. पण याच रिलेशनशिपमुळे तिला हा आजार झाल्याचं कळतंय. युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षापासून ती आपल्या प्रियकरासोबत विचित्र वागू लागली. तिचं हे वागणं पाहून बॉयफ्रेण्डला धक्का बसू लागला होता. अशावेळी त्याने थेट पोलिसात धाव घेतली. यानंतर शिओयूला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली.

बॉयफ्रेण्डवर होती अवलंबून

शिओयूने आपल्या प्रेमाखातर स्वतःला खूप वाहून नेलं होतं. प्रियकराने सतत आपल्याशी बोलावं असा तिचा अट्टाहास असायचा. त्याच्याबाबत प्रत्येक माहिती तिला हवी असायची. तिच्या या वागणुकीमुळे बॉयफ्रेण्डला पसर्नल स्पेस मिळत नव्हती. त्याची घुसमट होत होती. तिच्या अशा वागण्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला.

रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण..

एका दिवसात १०० कॉल

एक दिवस असा उजाडला जेव्हा, शिओयूचा बॉयफ्रेण्ड तिचा फोन उचलत नव्हता. तिने त्याला एका दिवसात १०० पेक्षा अधिक कॉल केले. बॉयफ्रेण्ड फोन उचलत नाही. रिप्लाय देत नाही, या गोष्टीमुळे तिचं मन तिला खात होतं. त्यानंतर ती अत्यंत अस्वस्थ झाली. घरातील वस्तूंची तोडफोड करू लागली. या सगळ्या गोष्टी पाहून, बॉयफ्रेण्डही घाबरला. इतकंच नव्हे तर, शिओयूने आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती. बाल्कनीतून उडी मारत असल्याचं तिने आपल्या बॉयफ्रेण्डला सांगितलं. परंतु, दैव बलवत्तर म्हणून बॉयफ्रेण्डने वेळीच पोलिसांना बोलावून शिओयूचे प्राण वाचवले.

चहाशिवाय चैन पडत नाही आणि चहाने ॲसिडिटी होते? चहा पिण्याआधी प्या १ गोष्ट'; त्रास बंद

शिओयूला झाला आहे विचित्र आजार

या धक्कादायक घटनेनंतर तिला, तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिची तपासणी केली असता, तिला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचं निदान झालं. मुलीवर उपचार करणारे डॉक्टर डू ना म्हणतात, 'बॉर्डलाइन पर्सनलिटी डिसॉर्डरमुळे लोक सतत चिंतेत असतात. अशा परिस्थितींचा संबंध, बऱ्याचदा वाईट अनुभवांशी असू शकतो. बरेच लोक लहानपणीपासून आपल्या पालकांसोबत पटवून घेत नसे. अशा लोकांमध्ये हा आजार निदर्शनास येतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार द्या. जर हे प्रकरण वाढलं तर, वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. पण जर ही समस्या रिलेशनशिपमध्ये आढळत असेल तर, याला 'लव्ह ब्रेन' असं म्हणतात.'

Web Title: Girl calls her boyfriend over 100 times a day, diagnosed with 'Love Brain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.