Join us  

....म्हणून चिमुकलीने आपल्या शिक्षकांची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडेच केली! पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 1:09 PM

Girl Complains to Prime Minister Narendra Modi about Teacher gives so much Homework Viral Video: क्यूट पण विचार करायला लावणारा हा व्हिडिओ एकदा पाहाच...

ठळक मुद्देइतक्या लहान वयात आम्हाला थोडा तरी वेळ द्या अशी विनवणीच ही लहान मुलगी मोदीजींकडे करत आहेया मुलीचा हा व्हिडिओ खरंच मोदीजींपर्यंत पोहोचणार का आणि त्यावर ते काही अॅक्शन घेणार का हा प्रश्नच आहे. 

लहान मुलं किती निरागस असतात हे आपण वेळावेळी अनुभवतो. त्यांना कोणी त्रास दिला की ते अगदी सहज आपल्या आई-वडिलांकडे त्याची तक्रार करतात. मग कधी ही तक्रार मित्रमैत्रीणींची असते तर कधी बहिण-भावंडांची. इतकंच काय मुलं अनेकदा आईने एखादी गोष्ट करायला सांगितली आणि ती करायची नसेल तर वडीलांकडे जातात आणि वडील कोणत्या कारणावरुन ओरडले तर येऊन आईला सांगतात. पण आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीची तक्रार करायची हे त्यांना अगदी नीट कळत असतं. आता हे सगळं त्यांच्या निरागसपणानुसार ठिक असेलही. पण एका चिमुकलीने आपल्या शाळेच्या शिक्षकांची तक्रार आई-वडील किंवा मुख्याध्यापकांकडे नाही केली. तर या मुलीने शिक्षक खूप अभ्यास देतात हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले (Viral Video). तिच्या या तक्रारीचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि तिच्या तक्रारीवर खरंच विचार करण्याची गरज असल्याचे अनेकांनी म्हटले (Girl Complains to Prime Minister Narendra Modi about Teacher gives so much Homework). 

(Image : Google)

ही मुलगी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणते नमस्कार मोदीजी, तुम्ही कसे आहात? माझं नाव अलीजा आहे, मी अमुक शाळेत असून शाळेतून आम्हाला इतका जास्त अभ्यास दिला जातो की आम्हाला दिवसभर दुसरं काहीच करायला वेळ मिळत नाही. शिक्षकांना वाटतं आम्ही सतत खूप होमवर्क केला पाहिजे. तुम्हीच म्हणता मुलांना खेळायला, मस्ती करायला थोडा वेळ द्या, पण ते तर आम्हाला अजिबात खेळू देत नाहीत. आम्हाला एकच दिवस सुट्टी मिळते, इतक्या होमवर्कमुळे आमची आईही वैतागते. 

इतक्या लहान वयात इतकं काम कोण देतं, मोठं झाल्यावर जास्त काम द्या, पण इतक्या लहान वयात आम्हाला थोडा तरी वेळ द्या अशी विनवणीच ही लहान मुलगी मोदीजींकडे करत असल्याचे दिसते. या मुलीचा बोलण्याचा सूरही इतका क्यूट आणि तक्रारीचा आहे की अभ्यासाच्या ओझ्याने ती किती वैतागली आहे हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट समजत आहे. ट्विटरवर कुमार आयुष (kumarayush084) या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून १३ हजारांहून अधिकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत मुलांना अभ्यासाचे, दप्तराचे ओेझे देऊ नका अशी विनंती केली आहे. तर काहींनी मोदीजींना या विषयात लक्ष घाला असे सांगत त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. आता या मुलीचा हा व्हिडिओ खरंच मोदीजींपर्यंत पोहोचणार का आणि त्यावर ते काही अॅक्शन घेणार का हा प्रश्नच आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलनरेंद्र मोदीशाळालहान मुलं