Join us  

Girl Fight with Boyfriend :गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला चांगलंच बुकलून काढलं; मेट्रोमधल्या जोडप्याच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 9:26 AM

Girl Fight with Boyfriend :मेट्रोमध्ये तमाशा सुरू असतानाच दोघे मेट्रोचे गेट उघडतात आणि  खाली उतरतात. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत.

एका जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही चालत्या मेट्रोमध्ये जोरदार भांडताना दिसत आहेत. त्यांची हाणामारी इतकी झाली की दोघांनी एकमेकांना थप्पड मारली आणि बाचाबाची झाली. आता लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. यासोबतच मजेशीर कमेंट्सही केल्या जात आहेत. वापरकर्ते म्हणत आहेत की हे प्रेम आहे... तर काहींनी ते नक्कीच लग्न करणार असल्याचे सांगितले. (Girl fight with boyfriend in metro internet shocked to see this viral video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. दोघे गेटजवळ उभे आहेत. अचानक ती मुलगी त्या व्यक्तीला धक्काबुक्की करते. प्रवासी त्यांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजतात! मुलगी म्हणते माझ्याशी बोलू नकोस. तो मुलगा रागाने म्हणतो की जा इथून... बोलू नकोस. यानंतर मुलीला राग येतो.ती त्या मुलाला चापट मारते आणि त्याला गप्प बसायला सांगते. त्यानंतर दोघेही एकमेकांना थप्पड मारतात. मुलगी म्हणते मी आईला सांगेन... तुझ्यासारखा मुलगा कुणाला मिळू नये.

पाण्याच्या लोंढ्यात वाहून चालली तरी तिनं हातातली सेल्फी स्टिक सोडली नाही; सेल्फीचा सोस पाहून लोक म्हणाले..

मेट्रोमध्ये तमाशा सुरू असतानाच दोघे मेट्रोचे गेट उघडतात आणि  खाली उतरतात. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. काहींनी लिहिले की हे खरे प्रेम आहे. एकाने लिहिले - प्रेमात काय करावे आणि ऐकावे लागते ते पाहा.  हा व्हिडीओ कुठे आणि केव्हा शूट करण्यात आला, हा व्हिडिओ खरा आहे की प्रॅक याची अद्याप पुष्टी झालेली नाही.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया