Lokmat Sakhi >Social Viral > ऐकावे ते नवलच! चार महिने ‘तिने’ आंघोळच केली नाही, शेवटी वैतागून रुममेटने...

ऐकावे ते नवलच! चार महिने ‘तिने’ आंघोळच केली नाही, शेवटी वैतागून रुममेटने...

Girl Had Not Bathed for Four Months See How her Roommate Reacts : वैतागलेल्या रुममेटने केला हा उपाय आणि मग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 01:32 PM2022-12-06T13:32:38+5:302022-12-06T13:55:30+5:30

Girl Had Not Bathed for Four Months See How her Roommate Reacts : वैतागलेल्या रुममेटने केला हा उपाय आणि मग...

Girl Had Not Bathed for Four Months See How her Roommate Reacts : It's amazing to hear! For four months 'she' didn't take a bath, something her roommate did out of frustration... | ऐकावे ते नवलच! चार महिने ‘तिने’ आंघोळच केली नाही, शेवटी वैतागून रुममेटने...

ऐकावे ते नवलच! चार महिने ‘तिने’ आंघोळच केली नाही, शेवटी वैतागून रुममेटने...

Highlightsया पोस्टवर असंख्य कमेंटसचा पाऊस पडला असून ही घटना काहीशी अजबच आहे असे म्हणावे लागेल.हे सगळे कोणत्या शहरात घडले याबाबत मात्र अद्याप काही समजू शकले नाही. 

आंघोळ ही आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग असते. शरीर स्वच्छ होण्यासाठी आणि आपल्याला फ्रेश वाटावे म्हणून आपण दररोज आंघोळ करतो. सुट्टीच्या दिवशी किंवा आजारपणात एखाद दिवस आंघोळ न करणे ठिक आहे. पण काही दिवस आंघोळ केली नाही की आपल्याला अस्वच्छ वाटायला लागते. इतकेच नाही तर आपल्या अंगाला घामाचा वासही यायला लागतो. रोजच्या रोज आंघोळ केली की अंगावरची धूळ, घाम निघून जाऊन आपण स्वच्छ तर होतोच पण आंघोळीमुळे आपल्याला आतून फ्रेश वाटते. पण काही जणांना या आंघोळीचा खूपच कंटाळा असतो. अशावेळी एखाददोन दिवस आंघोळ न करणे ठिक आहे. पण काही महिने आंघोळ केली नाही तर आपली काय अवस्था होईल याची आपण कल्पनाही करु शकत नाही (Girl Had Not Bathed for Four Months See How her Roommate Reacts). 

(Image : Google)
(Image : Google)

पण एका मुलीने एक दोन नाही तर तब्बल ४ महिने आंघोळच केली नाही. त्यानंतर तिच्यासोबत राहणाऱ्या रुममेटची काय अवस्था झाली असेल आणि मग तिने काय केले याबाबत नुकतेच समोर आले आहे. आपल्यासोबत राहणारी मुलगी कित्येक महिने आंघोळ करत नाही म्हणून एका महिलेने सोशल मीडिया साईट असलेल्या रेडीटची मदत घेतली. सुरुवातीला तिने तिच्यासोबतची रुम सोडली आणि मग तिने सोशल मीडीयावर ही महिला इतके महिने आंघोळच करत नसल्याचे उघडपणे सांगितले. मी आंघोळ करेन असं म्हणते आणि करतच नाही, तिला सांगण्याचा प्रयत्न केला तरी ती ऐकून घेत नाही. तिच्या या गोष्टीमुळे माझ्या आरोग्यालाही त्रास होण्याची शक्यता असल्याने आपण तिच्यासोबतची रुम सोडल्याचे महिलेने आपल्या पोस्टमध्ये सांगितले. 

याबाबत आपण आपल्या घरमालकाला सांगितल्यानंतर तो तिथे आला आणि त्याला वासामुळे उलटीसारखे झाल्याचेही या महिलेने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिला ३० दिवसांत रुम खाली करण्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावरची पोस्ट पाहून या मुलीने आपल्याला शिव्या दिल्या. इतकेच नाही तर आता तिने आंघोळ केल्याने मला रडू येत आहे असेही या महिलेने पोस्टची अपडेट देताना म्हटले आहे. या पोस्टवर असंख्य कमेंटसचा पाऊस पडला असून ही घटना काहीशी अजबच आहे असे म्हणावे लागेल. मात्र हे सगळे कोणत्या शहरात घडले याबाबत मात्र अद्याप काही समजू शकले नाही. 
 

Web Title: Girl Had Not Bathed for Four Months See How her Roommate Reacts : It's amazing to hear! For four months 'she' didn't take a bath, something her roommate did out of frustration...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.