Lokmat Sakhi >Social Viral > Girl Slapped Driver 17 Times : कारला रिक्षा ठोकली म्हणून महिलेनं रिक्षावाल्याला तब्बल १७ वेळा कानाखाली मारलं; पाहा व्हिडिओ

Girl Slapped Driver 17 Times : कारला रिक्षा ठोकली म्हणून महिलेनं रिक्षावाल्याला तब्बल १७ वेळा कानाखाली मारलं; पाहा व्हिडिओ

Girl Slapped Driver 17 Times : महिलेने ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:58 PM2022-08-14T12:58:48+5:302022-08-14T13:45:23+5:30

Girl Slapped Driver 17 Times : महिलेने ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. 

Girl Slapped Driver 17 Times : Shocking video viral girl slapped driver 17 times in 90 seconds watch here | Girl Slapped Driver 17 Times : कारला रिक्षा ठोकली म्हणून महिलेनं रिक्षावाल्याला तब्बल १७ वेळा कानाखाली मारलं; पाहा व्हिडिओ

Girl Slapped Driver 17 Times : कारला रिक्षा ठोकली म्हणून महिलेनं रिक्षावाल्याला तब्बल १७ वेळा कानाखाली मारलं; पाहा व्हिडिओ

रोड रेज प्रकरणांचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. रस्त्यात गाडी चालवताना  चालकाकडून चुक झाल्यास त्याचा चांगलीच किंमत मोजावी लागते अनेकदा मारामारीपर्यंत गोष्ट जाते. ही दृश्य तुम्ही अनेकदा पाहिली असतील. आता नोएडामधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला ई-रिक्षा चालकाला मारहाण करताना दिसत आहे. या धक्कादायक व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. महिलेने ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.  (Shocking video viral girl slapped driver 17 times in 90 seconds watch here)

नोएडा पोलिसांनी शनिवारी एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी महिलेचे नाव किरण सिंग आहे. ती नोएडा येथील रहिवासी असून ती मूळची आग्रा येथील रहिवासी आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले की,  ई-रिक्षा आणि वॅगन कारमध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर ही घटना घडली. महिला कारमधून खाली उतरली आणि ई-रिक्षा चालकाला अनेक वेळा मारलं.

कमाल! पोरगी डॉक्टर झाल्याच्या आनंदात आईनं लावले भलेमोठे होर्डिंग, पाहा फोटो

व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी महिला केवळ 90 सेकंदात किमान 17 वेळा ई-रिक्षा चालकाला कानाखाली मारताना दिसत आहे. ही महिला ई-रिक्षा चालकाला  कॉलर पकडून तिच्या कारवरील स्क्रॅचेच दाखवताना दिसत आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

 

Web Title: Girl Slapped Driver 17 Times : Shocking video viral girl slapped driver 17 times in 90 seconds watch here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.