Lokmat Sakhi >Social Viral > Girl Starts Scooty & Crashes : मंदिराबाहेर स्कूटी सुरू करायला गेली; थेट देवाच्या चरणाशी आदळली, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

Girl Starts Scooty & Crashes : मंदिराबाहेर स्कूटी सुरू करायला गेली; थेट देवाच्या चरणाशी आदळली, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

Girl starts scooty and crashes inside the temple : 27 सेकंदाच्या या क्लिपमध्ये मंदिराबाहेर एक पांढरी स्कूटी उभी असल्याचे तुम्ही पाहू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:24 PM2022-12-07T12:24:13+5:302022-12-07T12:36:00+5:30

Girl starts scooty and crashes inside the temple : 27 सेकंदाच्या या क्लिपमध्ये मंदिराबाहेर एक पांढरी स्कूटी उभी असल्याचे तुम्ही पाहू शकता.

Girl starts scooty and crashes inside the temple infront of god internet says papa ki pari ka talent old video goes viral | Girl Starts Scooty & Crashes : मंदिराबाहेर स्कूटी सुरू करायला गेली; थेट देवाच्या चरणाशी आदळली, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

Girl Starts Scooty & Crashes : मंदिराबाहेर स्कूटी सुरू करायला गेली; थेट देवाच्या चरणाशी आदळली, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

सोशल मीडियावर अनेकदा जुने व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इंटरनेटवर सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेतात. असाच एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक मुलगी सरळ मंदिरात जाऊन आदळते. (Girl starts scooty and crashes inside the temple) ही महिला शिव मंदिराच्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्या स्कूटीवरून जाऊ लागली तेव्हा स्कूटीचा अॅक्सिलेटर इतका जोरात फिरला की ती स्कूटी घेऊन थेट मंदिराच्या आत पडली. मात्र, तिने कसेतरी स्वत:ला सावरले आणि स्वतःहून उभी राहिली. ही संपूर्ण घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता ही क्लिप पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

27 सेकंदाच्या या क्लिपमध्ये मंदिराबाहेर एक पांढरी स्कूटी उभी असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्या स्कूटीवर एक मुलगी बसली आहे. ती ती स्कूटी सुरू करते आणि थेट मंदिराच्या दारावर जाऊन आदळते. स्कूटी एका बाजूला पडली आणि त्यावर बसलेली महिला थेट नंदीच्या मूर्तीवर पडली. ती अशी पडते की जणू नंदीला नतमस्तक झाल्यासारखे वाटते! त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ @JaikyYadav16 नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे - देव सर्वशक्तिमान आहे, जेव्हा तो त्याच्या दरबारात बोलावेल तेव्हा तुम्हाला जावे लागेल. या ट्विटला 4 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून व्हिडिओला 84 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

मुलाकडचा आहे अशी थाप मारुन तो बिंधास्त लग्नात जेवायला गेला, अन् घडलं असं काही.. पाहा व्हिडिओ

ही क्लिप पाहिल्यानंतर यूजर्सला हसू आवरता येत नाही. एकाने लिहिले, ती एक महिला आहे, ती काहीही करू शकते. दुसर्‍याने लिहिले - पण ही पापाची परी आहे... तिसर्‍याने लिहिले, ही एक निंजा टेक्निक आहे.  या व्हिडिओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

Web Title: Girl starts scooty and crashes inside the temple infront of god internet says papa ki pari ka talent old video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.