Lokmat Sakhi >Social Viral > घोड्याजवळ जाऊन रिल्स बनवणं पडलं महागात ; व्हायरल व्हिडिओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू...

घोड्याजवळ जाऊन रिल्स बनवणं पडलं महागात ; व्हायरल व्हिडिओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू...

Viral Video : रील्ससाठी लोक काय करतील सांगता येत नाही, पाहा या मुलीची कमाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 03:43 PM2022-07-10T15:43:23+5:302022-07-10T15:45:35+5:30

Viral Video : रील्ससाठी लोक काय करतील सांगता येत नाही, पाहा या मुलीची कमाल...

girl was dancing for making reels by standing near the horse what happened next ; Your smile will not stop watching viral videos ... | घोड्याजवळ जाऊन रिल्स बनवणं पडलं महागात ; व्हायरल व्हिडिओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू...

घोड्याजवळ जाऊन रिल्स बनवणं पडलं महागात ; व्हायरल व्हिडिओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू...

Highlightsसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरुन त्या तरुणीची सगळ्यांनी खिल्ली उडवल्याचे दिसते.घोडा गवत खात असताना त्याला अशाप्रकारे डिस्टर्ब केल्याने तो तरुणीला अशी रिअॅक्शन देतो हे आपल्याला दिसते

इन्स्टाग्रामवर रील्स कऱण्याचे सध्या खूप मोठ्या प्रमाणात फॅड आहे. या इन्स्टा रिल्ससाठी लोक कधी, कुठे आणि काय करतील याचा नेम नाही. लोकांना या रिल्सचे इतके वेड लागले आहे की कुठेही गेले की ते आपले व्हिडिओ शूट करत असतात. असे करताना कधी एखादा अपघात घडतो तर कधी काही मजेशीर घटना घटते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता कोणतीच गोष्ट लपणे शक्य नसल्याने अगदी कमी वेळात ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते आणि त्याचं चांगलंच हसं होतं. पण काही वेळा मजा करण्याच्या नादात आपल्याला होणारी सजा चांगलीच महागात पडते. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून रिल्स करण्यासाठी तरुणी करत असलेली करामत पाहून आपल्याला हसू आवरणार नाही (girl was dancing for making reels by standing near the horse) . 

(Image : Google)
(Image : Google)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी निळ्या रंगाची साडी नेसून घोड्याच्या बाजूला थांबून डान्स करत आहे. हे करताना घोड्याने थोडी हालचाल केली की ती घाबरत असल्याचेही कॅमेरात कैद झाले आहे. सुरुवातीला डान्सच्या काही स्टेप्स ती करते आणि घोड्याला हातही लावण्याचा प्रयत्न करते. अतिशय जोशात डान्स करत असलेली ही तरुणी एख छान पोज जेते आणि तितक्यात या घोड्याला आपल्या शेजारी काहीतरी सुरू असल्याचे समजते. त्या गोष्टीने घोडा अस्वस्थ होतो आणि तो थेट तिच्या तोंडाजवळ तोंड नेतो. अचानक घोडा इतका जवळ आल्याने ही तरुणी घाबरुन काहीशी बाजूला होते. तितक्या घोडा आणखी जोराने तिच्या बाजूला येत उडी मारतो. मग तर या तरुणीची पुरती गाळण उडाल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. 

प्राणी मुके असले तरी त्यांना आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे याचे भान असतेच. घोडा गवत खात असताना त्याला अशाप्रकारे डिस्टर्ब केल्याने तो तरुणीला अशी रिअॅक्शन देतो हे आपल्याला दिसते. इतकेच नाही तर ही तरुणी सुरुवातीला त्याच्या शेपटाला नंतर त्याच्या अंगालाही हात लावते. यामुळे कदाचित हा घोडा चिडतो आणि ती दूर जावी यासाठी थेट उडीच मारतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरुन त्या तरुणीची सगळ्यांनी खिल्ली उडवल्याचे दिसते. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ४० हजार जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर कमेंटसही केल्या आहेत. एकाने 'कर आणखी रिल्स' असे म्हटले आहे तर दुसऱ्याने 'थोडक्यात वाचली नाहीतर जीव धोक्यात होता' असं म्हटलं आहे. 
 

Web Title: girl was dancing for making reels by standing near the horse what happened next ; Your smile will not stop watching viral videos ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.