मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकवेळा मेट्रोमध्ये लोक गाताना आणि नाचतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत. विशेषतः मेट्रोमध्ये मारामारी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात (Girls Fighting in Metro) असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली दिल्ली मेट्रोमध्ये बसण्यासाठी भांडत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकल ट्रेनमधील भांडणांची या व्हिडिओनं आठवण करून दिली आहे. (Girls fighting in delhi metro arguement for seat must watch viral video)
साडी नेसलेली एक महिला मेट्रोच्या सीटवर बसली आहे आणि तिने तिची बॅगही सीटवर ठेवली आहे. तिच्या शेजारी दुसरी मुलगी सीटवर तिची बॅग घेऊन बसली आहे. तेवढ्यात एक मुलगी तिथे येते आणि साडीवरच्या महिलेला तिला जागा देण्यास सांगते. पण साडीतली मुलगी स्पष्टपणे नकार देते आणि म्हणते की जागा नाही. यानंतर, दुसरी मुलगी एका छोट्याशा रिकाम्या जागेत बसते, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होतो. प्रकरण खूप वाढते, पण त्यांच्या शेजारी बसलेली एक मुलगी शांततेत बर्गर खाण्यात मग्न असते.
सलाम! ड्रमवर चढून झेंडा फडकवणाऱ्या आजींना पतीची साथ; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....
हा व्हिडिओ पाहून लोक खूप एन्जॉय करत आहेत आणि व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. @Wellutwt नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "प्रत्येकजण भांडण पाहण्यात व्यस्त आहे, परंतु शेजारी बसलेली मुलगी बर्गरचा कचरा खाली फेकत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही."