आपण सगळे बरेचदा सुट्ट्यांसाठी समुद्रकिनारी जातो. समुद्रात पोहायला, डुंबायला किंवा नुसते समुद्रकिनारी फिरायला आपल्याला आवडते. यावेळी आपल्याला समुद्रात खेकडे, वेगवेगळ्या प्रकारचे किडे, मासे असे काही ना काही दिसते. आता हे सगळे ठिक आहे पण समुद्रात पोहत असताना अचानक आपल्याला शार्क मासा दिसला तर आपले काय होईल याचा विचार करा.
हा सर्वात मोठ्या आकाराचा मासा आपण अनेकदा टिव्हीमध्ये किंवा चित्रातच पाहिलेला असतो. प्रत्यक्षात तो आपल्या जवळ आला तर काय होईल याची कल्पना आपण कोणीच केलेली नसते. मात्र समुद्रात पोहत असताना २ तरुणींच्या पुढ्यात अचानक शार्क आला आणि मग त्यांचे काय झाले असेल याची आपण कल्पना करु शकतो.
शार्क हा अवाढव्य आणि शिकारी मासा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तो माणसांचीही शिकार करण्याची शक्यता असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये या तरुणी समुद्रात पोहत असताना पाण्यात शार्क मासा असल्याचे त्यांच्या लक्षात येते. मग त्यांचे धाबे असे काही दणाणले की पुढे काय झाले हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसू शकते. लाईफ जॅकेट घातलेल्या या तरुणी पोहताना अचानक थांबतात कारण बाजूने अचानक शार्क मासा येताना दिसतो. त्याला पाहून त्या इतक्या घाबरतात की त्या ओरडायला लागतात.
या दोघींच्या बाजूला एक लहान बोटही दिसते. या तरुणी याठिकाणहून बाजूला जातात आणि नंतर आपल्यावा या माशाचे भव्य रुप दिसते. सुदैवाने त्या दोघीही माशाच्या तावडीतून वाचतात. ट्विटरवर ओव्हरटाईम या पेजवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अवघ्या १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला या घटनेची भिषणता लक्षात येते. कॅमेरात पाण्याच्या खाली असलेला हा मासा अतिशय परफेक्ट कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एका दिवसांत हा व्हिडिओ १ लाख १० हजार जणांनी पाहिला असून अनेकांनी तो रिट्विटही केला आहे. ‘मी पुन्हा कधीच समुद्रात जाणार नाही अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे.