Join us  

विनी आणि ग्लेन मॅक्सवेलची लव्हस्टोरी! प्रेमातही त्याने मानली नाही हार, वाचा प्यारवाली लव्हस्टोरी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 12:52 PM

Glenn Maxwell & ‘Desi Girl’ Vini Raman’s Love Story : ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची बायको भारतीय वंशाची, पाहा ग्लेन मॅक्सवेलच्या लव्हस्टोरीतला ट्विस्ट

क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. याचाच प्रत्येय ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानच्या धमाकेदार मॅचमध्ये पाहायला मिळाला. आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ मधील ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तावर अशक्य असा विजय मिळवला. पण या विजयाचा खरा मानकरी धाकड फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ठरला. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला गमावलेला सामना एकहाती जिंकून दिला. ग्लेन वेदनेत असतानाही त्याने १२८ चेंडूत २०१ धावांची नाबाद खेळी केली, व एकट्याने ऑस्ट्रेलियन संघाला विजयापर्यंत नेले. मॅक्सवेलने मिळवून दिलेल्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप २०२३ च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला.

मॅक्सवेलच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला असतानाही त्याने मैदान सोडलं नाही. ग्लेनच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. क्रिकेट व्यतिरिक्त ग्लेन आपल्या प्रेमामुळेही चर्चेत राहिला होता. त्याने भारतीय वंशाच्या मुलीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांची सोशल मीडियात खूप चर्चा झाली होती. ती महिला नक्की कोण? त्यांची प्रेम कथा एवढी व्हायरल का झाली होती?(Glenn Maxwell & ‘Desi Girl’ Vini Raman’s Love Story).

..आणि लव्हस्टोरीत ट्विस्ट

क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलच्या पत्नीचे नाव विनी रमण असे आहे. विनी आणि मॅक्सवेल हे दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. विनी आणि मॅक्सवेल यांनी १४ मार्च २०२० रोजी साखरपुडा उरकला. मात्र, कोरोनामुळे त्यांचं लग्न लांबणीवर गेलं होतं. दरम्यान, १८ मार्च २०२२ रोजी भारतीय पद्धतीने त्याचं लग्न जोरात पार पडलं.

ऐश्वर्या रायला विश्वसुंदरी आणि अभिनेत्री व्हायचे नव्हते तर.. पाहा ऐश्वर्याविषयी माहीत नसलेल्या ९ गोष्टी

विनी रमण नक्की आहे तरी कोण?

ग्लेन आणि विनी यांची पहिली भेट ऑस्ट्रेलियामध्येच झाली होती. विनीचे कुटुंबीय मुळचे चेन्नईतील, मात्र, तिचा जन्म ३ मार्च १९९३ रोजी ऑस्ट्रेलियात झाला. विनीचे वडील वेंकट रमण आणि आई विजयलक्ष्मी रमण विनीच्या जन्माआधीच ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले होते. त्यामुळे तिचा जन्म हा ऑस्ट्रेलियात झाला. तिथेच तिने आपले शिक्षण पूर्ण केले.  विनी ही मेलबर्नमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत असल्याची माहिती, तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून मिळते.

एका स्थानिक सामन्याच्या वेळी विनी आणि ग्लेन यांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांची मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, मग त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचं ठरवलं. त्यानंतर या दोघांना ११ सप्टेंबर २०२३ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव लोगन मॅव्हरिक मॅक्सवेल असे ठेवले.

कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

द्विशतक केल्यानंतर विनीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

पती मॅक्सवेलने नाबाद २०१ धाव झळकावल्यानंतर विनि रमणने, तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. विनि रमणने मैदानात मॅक्सवेल फलंदाजी करत असतानाचा स्टॅण्डमधून काढलेला फोटो पोस्ट केला. विनीने त्या पोस्टमध्ये '२०१ नाबाद असा आकडा लिहून ऑल द इमोशन्स' अशा कॅप्शनसहीत पोस्ट केले आहे. तिची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. 

टॅग्स :ग्लेन मॅक्सवेलदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टसोशल व्हायरल