Join us  

काय वाट्टेल ते! तुम्ही खाल्लीये कधी पाणीपुरी सॉफ्टी? फोटो पाहून चढला नेटीझन्सचा पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 12:41 PM

Golgappa Softy Ice Cream Viral Video : या व्हिडिओमध्ये पुरी फोडून त्यामध्ये चक्क सॉफ्टी आईस्क्रीम भरताना दिसत आहे.

ठळक मुद्देया डीशची किंमत ३० रुपये असून कितीही रुपये देऊन हा प्रकार कोण खाणार हाच खरा प्रश्न आहे. पाणीपुरी आणि आईस्क्रीमसारख्या दोन्ही पदार्थाची विचित्र पद्धतीने वाट लावल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

खाण्याच्या पदार्थांबाबत नवनवीन प्रयोग करावेत आणि वेगवेगळे पदार्थ ट्रायही करावेत. मात्र सध्या काय वाट्टेल ते प्रयोग करण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. कधी कोक मॅगी कर कधी चॉकलेट सामोसा असं काय वाट्टेल ते कॉम्बिनेशन करुन खाल्ले जाते आणि विकलेही जाते. पाणीपुरीच्या बाबतीत तर कायमच काही ना काही भन्नाट प्रयोग होताना दिसतात. सोशल मीडियावर या गोष्टी वेगाने व्हायरल होतात आणि लोक काय करु शकतात याचा आपल्याला अंदाज येतो. कधी पिझ्झा पाणीपुरी केली जाते तर कधी चॉकलेट पाणीपुरी. आपल्याला चटपटीत अशी चिंचेची आणि तिखट चटणी घातलेली पाणीपुरी माहित आहे (Golgappa Softy Ice Cream Viral Video). 

(Image : Google)

पाणीपुरी म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. भारताच्या वेगवेगळ्या भागात ही पाणीपुरी वेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चवीची मिळते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही पाणीपुरी अतिशय आवडीने खाताना दिसतात. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात पाणीपुरी सॉफ्टी दिसत आहे. आता अशी पाणीपुरी आपण क्वचितच ट्राय केली असेल. पाणीपुरीच्या पुऱ्या फोडून त्यामध्ये पुदीन्याचे तिखट पाणी आणि गोड पाणी आणि पांढऱ्या वाटाणे घालून दिले जातात. तर या व्हिडिओमध्ये पुरी फोडून त्यामध्ये चक्क सॉफ्टी आईस्क्रीम भरताना दिसत आहे. इतकेच नाही तर त्याच्या वर स्ट्रॉबेरीची जेली आणि टुटीफ्रूटीही टाकताना दिसत आहेत. आता हे कसे लागत असेल हे आपण इमॅजिन न केलेलेच बरे. 

कारण अशाप्रकारचे असंख्य प्रयोग होत असतात आणि त्यामध्ये मूळ पदार्थाचा वाट लावली जाते. इन्स्टाग्रामवर एका फूड ब्लॉगरने हा व्हिडिओ पोस्ट केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या प्रयोगाला शिव्या घातल्या आहेत. अशाप्रकारे पाणीपुरी आणि आईस्क्रीमसारख्या दोन्ही पदार्थाची विचित्र पद्धतीने वाट लावल्याचे मत अनेकांनी या व्हिडिओवर व्यक्त केले आहे. आता मरण्याची वेळ आली असेही एकाने या पोस्टला कमेंट करताना म्हटले आहे. या डीशची किंमत ३० रुपये असून कितीही रुपये देऊन हा प्रकार कोण खाणार हाच खरा प्रश्न आहे. ही डीश नेमकी कुठे मिळते हे अद्याप कळू शकले नसले तरी हा प्रयोग अगदीच बोगस असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्न