कॉफी हा अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. आपल्याकडे जसे चहाप्रेमी आहेत तशीच आता कॉफी प्रेमींची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चहा कितीही आवडत असला तरी मनात कॉफीबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतोच. ब्लॅक कॉफी, फिल्टर कॉफी, एस्प्रेसो कॉफी असे कॉफीचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील आणि प्यायलेही असतील. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जिच्यासाठी कायम भांडतात ती 'फ्लॅट व्हाईट कॉफी' तुम्ही कधी ऐकली आहे का किंवा पिऊन पाहिली आहे का (Google Doodle celebrates flat white coffee)? आता ही कॉफी नेमकी आहे कशी आणि तिच्यासाठी दाेन बलाढ्य देश एकमेकांशी का झुंजतात, ते बघा... (what is flat white coffee)
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांचं असं म्हणणं आहे की 'फ्लॅट व्हाईट कॉफी' ही मुळची त्यांच्या देशातली आहे. ती आमच्या देशातलीच कशी आहे, हे सांगण्यासाठी १९८० मध्ये त्या दोन देशांनी दावा केला आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये कायम वाद असतात.
शेवटी या वादावर असा तोडगा काढण्यात आला आहे की दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी ही कॉफी बनवण्यात येते. आणि कॉफी बनविण्याची जी रेसिपी आहे ती त्यांची त्यांची मूळ रेसिपी आहे. ११ मार्च २०११ रोजी Oxford English Dictionary मध्ये 'फ्लॅट व्हाईट कॉफी' या शब्दाची अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली. तेव्हापासून ११ मार्च हा दिवस 'फ्लॅट व्हाईट कॉफी' डे म्हणून साजरा केला जातो.
फ्लॅट व्हाईट कॉफी रेसिपी
काही कॉफी खूप कडवट असतात कारण त्यात कॉफी पावडरचे प्रमाण जास्त असते. या कॉफीमध्ये इतर कॉफीच्या तुलनेत थोडी कमी प्रमाणात काॅफी टाकली जाते.
बघा स्वयंपाकाची अजब तऱ्हा, चक्क काजुकतलीची तळली भजी- व्हायरल व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....
मायक्रोफोम, कॅपेचिनो आणि दूध यांचा एक हलकासा थर या कॉफीवर असतो. मायक्रोफोममुळे या काॅफीला पांढरट घट्टपणा येतो. या कॉफीची खासियत अशी की सिरॅमिक कपामध्ये ही काॅफी सर्व्ह केली जाते आणि खूप छान कलात्मक पद्धतीने तिच्यावर कॉफी पावडर, कॅपेचिनो, फोम वापरून design केलं जातं.