जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन्स वीकमधील (Valentine's Week) आज सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे (Valentine's Day). तमाम कपल्ससाठी खास असणारा हा दिवस जास्त खास व्हावा यासाठी हॉटेल्स, वेगवेगळे रेस्टॉरंट, गिफ्ट देण्यासाठी बाजारातील कंपन्या एकाहून एक भन्नाट ऑफर्स देताना दिसतात. असे असताना गुगलही व्हॅलेंटाईन्सच्या शुभेच्छा देण्यात मागे कसे राहील? गुगल हा सध्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. काही ना काही गुगल केल्याशिवाय आपला दिवस संपत नाही. हेच लक्षात घेऊन गुगल कायम आपल्या युजर्ससाठी काही ना काही खास करत असते. आजच्या दिवसाचे निमित्त साधत गुगलनेही प्रेमी युगुलांकरिता खास डूडल (Google Doodle) तयार केले आहे.
3 डी अंदाजात असलेल्या डूडल मध्ये एक गेम आहे. यात डूडलमध्ये असलेल्या लव्ह बर्ड्सना एकमेकांपर्यंत पोहचवण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. तुम्ही प्ले बटणावर क्लिक करून हा खेळ खेळू शकता. त्यानंतर, स्क्रीनवर एक चक्रव्यूह दिसेल. Google चा लोगो पूर्ण होईपर्यंत लीव्हर आणि स्विचच्या मदतीने तुम्हांला दोन हॅमस्टरला पुन्हा एकत्र येण्यास मदत करायची आहे. पूर्ण झालेला लोगो दोन हॅमस्टर्सना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक बोगदा म्हणून काम करणार आहे. हॅमस्टर पुन्हा एकत्र आल्यानंतर, स्क्रीनवर व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छांचा संदेश आपल्याला मिळणार आहे.
It’s a love story, baby just s̶a̶y̶ ̶y̶e̶s̶ press play
— Google India (@GoogleIndia) February 14, 2022
Please help our hamster friends reunite this Valentine’s Day? #GoogleDoodle
https://t.co/k92PHLVw3i. pic.twitter.com/eTYW3A1P1U
आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने काहीतरी खास भेट द्या, त्यांना डेटवर घेऊन जा...इतकेच नाही तर त्यांच्यासाठी एखादा खास पदार्थ बनवा. आपण जोडीदारावर कायमच मनापासून प्रेम करत असलो तरी एक दिवस हे प्रेम व्यक्त करायला दिला तर बिघडते कुठे? एरवी आपली धावपळ, कामं सगळं चालूच असतं. मग अशाच एखाद्या खास दिवशी आपल्या खास व्यक्तीला शुभेच्छा देऊया की असा संदेश देणाऱ्या गुगलने शेवटच्या टप्प्यात हार्टच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलचा हा खेळ तुम्ही एकदा खेळून तर बघा...पाहा तुम्हाला जमतो का ते...जमला तरच मिळतील तुम्हाला गुगलकडून खास शुभेच्छा.