Lokmat Sakhi >Social Viral > गुगल - डूडलवर बॉलीवूडची 'चांदनी', गुगलने अनोख्या अंदाजात दिल्या श्रीदेवींना शुभेच्छा

गुगल - डूडलवर बॉलीवूडची 'चांदनी', गुगलने अनोख्या अंदाजात दिल्या श्रीदेवींना शुभेच्छा

Google Doodle today celebrates Sridevi’s birthday; from inspiring Bollywood journey to mysterious death श्रीदेवींच्या आठवणीत रमले गुगल, बनवले खास डूडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 11:52 AM2023-08-13T11:52:34+5:302023-08-13T14:02:09+5:30

Google Doodle today celebrates Sridevi’s birthday; from inspiring Bollywood journey to mysterious death श्रीदेवींच्या आठवणीत रमले गुगल, बनवले खास डूडल

Google Doodle today celebrates Sridevi’s birthday; from inspiring Bollywood journey to mysterious death | गुगल - डूडलवर बॉलीवूडची 'चांदनी', गुगलने अनोख्या अंदाजात दिल्या श्रीदेवींना शुभेच्छा

गुगल - डूडलवर बॉलीवूडची 'चांदनी', गुगलने अनोख्या अंदाजात दिल्या श्रीदेवींना शुभेच्छा

'मेरी बिंदिया तेरी नींदियाँ ना उड़ादे तो कहना' खरंच या गाण्याप्रमाणे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची अदा, सौंदर्य आणि अभिनयावर आजही चाहतावर्ग तितकाच फिदा आहे. श्रीदेवी यांचा आज ६० वा वाढदिवस. १३ ऑगस्ट १९६३ रोजी श्रीदेवी यांचा जन्म मद्रासच्या मीनमपट्टी येथे झाला. पण अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. आज गूगलने डूडलच्या माध्यमातून श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सध्या सर्व सर्च इंजिनवर असलेल्या डूडलची चर्चा रंगत असून, गुगलची ही अनोखी मानवंदना लक्षवेधी ठरत आहे(Google Doodle today celebrates Sridevi’s birthday; from inspiring Bollywood journey to mysterious death).

श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा यांगार अय्यपन होतं. त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी स्वतःचं नाव बदललं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं. तिला तिचे चाहते बॉलीवूडची 'चांदनी' म्हणत असत. पुरुष प्रधान फिल्म इंडस्ट्रीमध्ये श्रीदेवी एकमेव महिला सुपरस्टार होत्या. ८० – ९० च्या दशकात श्रीदेवी यांचं बॉलिवूडवर वर्चस्व होतं. श्रीदेवी यांना त्यांच्या कारकिर्दीत असंख्य अवॉर्ड्स देखील मिळाले. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. 

गुगल सर्च इंजिनवर श्रीदेवींचा फोटो

वाढदिवसाचे औचित्य साधून गुगलने खास श्रीदेवींसाठी डूडल तयार केलं. या फोटोमध्ये अभिनेत्री श्रीदेवी डान्स करताना दिसत आहे. यासोबतच तिच्या आजूबाजूला तिच्या भूमिकेमुळे ओळखल्या जाणाऱ्या सिनेमाची झलक पाहायला मिळत आहे. या डूडलमध्ये अभिनेत्री 'नागिन' या सुपरहिट चित्रपटातील पोज देताना दिसून येत आहे. हे खास डूडल गेस्ट आर्टिस्ट भूमिका मुखर्जी यांनी साकारली आहे.

She is the Barbie girl! १८,५०० बार्बी बाहुल्या जमवणाऱ्या बाईंची अजब वेडी गोष्ट

कमबॅक ठरला दमदार

काही कालावधीसाठी श्रीदेवी सिनेसृष्टीपासून दूर होत्या. १५ वर्षांच्या ब्रेकनंतर २०१३ साली 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातून त्यांनी दमदार कमबॅक केलं. त्यानंतर २०१८ मध्ये 'मॉम' चित्रपटातील भूमिकेमधून त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. वयाच्या ५४व्या वर्षी त्या ३०० कोटी संपतीच्या मालकीण झाल्या होत्या. ३ आलिशान घरं, ७ गाड्या आणि लक्स, यासह तनिष्कच्या ब्रँड अॅम्बेसेडर झाल्या होत्या.

१० वर्षांच्या मुलीने केली ५० देशांची सफर, एकही दिवस बुडवली नाही शाळा, हे घडलं कसं?

मनाला चटका लावणारी एग्जिट

श्रीदेवी यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. त्यांचा मृत्यू २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमध्ये झाला होता. दुबईमध्ये कौटुंबिक लग्नादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि बाथटबमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

Web Title: Google Doodle today celebrates Sridevi’s birthday; from inspiring Bollywood journey to mysterious death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.