Join us  

फरशीवर चिकट डाग पडलेत? पाण्यात ५ गोष्टी घालून फरशी पुसा, मिळेल चकाचक स्वच्छता झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 6:28 PM

Cleaning Tips to Keep Your Floors Sparkly Clean फरशीवर पडलेले चिकट डाग, तेलकटपणा घालवायचा तर काही घरगुती उपाय, महागड्या प्रॉडक्ट्सची गरजच नाही

बऱ्याचदा सणवार आले की, आपण घराची साफ सफाई करायला घेतो. साफ सफाई करताना घरातील कानाकोपरा साफ करतो. मात्र, धकाधकीच्या जीवनात वर्किंग वुमनला दररोज घर स्वच्छ ठेवणे जमत नाही. महिला आपली साप्ताहिक सुट्टी घर साफ करण्यासाठी राखून ठेवते. दररोज फरशी पुसली नाही की, लवकर खराब होते. त्यावर काळपट डाग पडू लागतात. ज्यामुळे फरशी लवकर चिकट होते, आणि खराब दिसते.

अशावेळी कितीही घासले तरी देखील फरशीवरील हट्टी डाग निघत नाही. याकरिता आपण महागड्या प्रोडक्ट्स वापर करतो, पाण्यात प्रोडक्ट्स मिसळून फरशी स्वच्छ करतो. मात्र, कधी कधी याचा फायदा होत नाही. फरशी स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती टिप्स आपल्या कामी येतील. ज्यामुळे फरशी चमकण्यास मदत होईल.

डिटर्जंटसह व्हिनेगर वापरा

फरशी स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंटसह व्हिनेगरचा वापर करा. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात चार ते पाच चमचे डिटर्जंट पावडर टाका. त्यानंतर चार चमचे व्हिनेगर मिसळा. आता हे मिश्रण जमिनीवरील डागांवर पसरवा. ५ मिनिटे तसेच राहू द्या. ५ मिनिटानंतर स्क्रबरच्या मदतीने फरशी घासा. यामुळे फरशी स्वच्छ चमकदार दिसेल.

टूथपेस्ट आणि डिश वॉश वापरा

फरशीवर पहिले डिश वॉश शिंपडा. पाच मिनिटे तसेच राहू द्या. नंतर त्यावर थोडी टूथपेस्ट लावा. आता फरशी स्क्रबरने घासून स्वच्छ करा. यामुळे जमिनीवरील डाग काही मिनिटांतच निघून जातील.

बेकिंग सोडा करेल मदत

व्हाईट फरशीवर शूज आणि चप्पलचे डाग सहज दिसून येतात. काही डाग लवकर निघत नाही. अशा वेळी बेकिंग सोड्याचा वापर करा. एका वाटीत पाणी घ्या, त्यात बेकिंग पावडर मिसळा. आता या मिश्रणात कापड भिजवून जमिनीवरील डाग साफ करा. यामुळे शूज आणि चप्पलचे डाग क्षणार्धात निघून जातील.

लिंबाच्या रसाचा वापर करा

लिंबामध्ये सॅट्रिक अॅसिडचा समावेश असतो. ज्यामुळे फरशीला नवी चमक येते. यासाठी एका बादलीत अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यात कापड टाकून फरशी पुसून घ्या. यामुळे फरशी चमकण्यास मदत होईल. तसेच फरशीवरील डाग निघून जातील आणि किटाणू देखील नष्ट होती.

गरम पाणी

गरम पाण्यामुळे डाग लवकर निघून जातात. यासाठी गरम पाणी घ्या. त्या गरम पाण्यात डिटर्जंट पावडर टाका. आता या पाण्याने फरशी स्वच्छ पुसून घ्या. या सोप्या उपायामुळे फरशी चमकेल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल