Lokmat Sakhi >Social Viral > किचनच्या टाइल्स चिकट-मेणचट झाल्या आहेत? ३ टिप्स, तेलकट टाइल्स १५ मिनिटांत दिसतील चकाचक

किचनच्या टाइल्स चिकट-मेणचट झाल्या आहेत? ३ टिप्स, तेलकट टाइल्स १५ मिनिटांत दिसतील चकाचक

Top Tips for Cleaning Kitchen Tiles स्वयंपाकघरात गॅस शेगडीवरच्या टाइल्स कितीही धुतल्या तरी तेलकट दिसतात, त्यावर हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 01:52 PM2023-02-14T13:52:22+5:302023-02-14T13:53:48+5:30

Top Tips for Cleaning Kitchen Tiles स्वयंपाकघरात गॅस शेगडीवरच्या टाइल्स कितीही धुतल्या तरी तेलकट दिसतात, त्यावर हा उपाय

Got sticky-waxy kitchen tiles? Follow 3 Tips, Oily tiles will look shiny in 15 minutes | किचनच्या टाइल्स चिकट-मेणचट झाल्या आहेत? ३ टिप्स, तेलकट टाइल्स १५ मिनिटांत दिसतील चकाचक

किचनच्या टाइल्स चिकट-मेणचट झाल्या आहेत? ३ टिप्स, तेलकट टाइल्स १५ मिनिटांत दिसतील चकाचक

घरातील सगळ्यात महत्वाची खोली म्हणजे किचन. या खोलीमध्ये प्रत्येकासाठी २ वेळचं जेवण शिजतं, पोटाची भूक भागते. घरातील महिला  किचनमध्ये विविध पदार्थ बनवते. तिच्यासाठी किचन ही खोली महत्वाची असते. काही महिला दिवसातील अधिक वेळ किचन साफ करण्यासाठी घालवतात. किचन साफ असेल तर घर देखील प्रसन्न वाटते. मात्र, किचन साफ करत असताना आपण सतत किचनच्या टाईल्स साफ करत नाही.

किचनच्या टाईल्सवर अधिक प्रमाणावर चिकटपणा साचतो. जेवण बनवत असताना फोडणीचे डाग, कुकरची स्टीम अशा विविध प्रकारचे डाग टाईल्सवर दिसून येतात. या चिकटपणामुळे टाईल्सवर बॅक्टेरीया आणि फंगस निर्माण होते. ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. काही टाईल्सवरील डाग सहजासहजी निघत नाही. हे डाग काढण्यासाठी घरगुती टिप्स फॉलो करा. विशेष मेहनत न घेता टाईल्सवरील डाग निघतील.

किचन टाईल्स साफ करण्यासाठी काही टिप्स

व्हिनेगर, मीठ आणि बेकिंग सोड्याचा करा असा वापर

किचन टाईल्सवरील हट्टी डाग काढण्यासाठी, व्हिनेगर, मीठ आणि बेकिंग सोड्याचा वापर करा. सर्वप्रथम, एका वाटीत अर्धा कप व्हिनेगर व अर्धा कप पाणी मिसळा. त्यानंतर त्यात मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा. मिश्रण तयार झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे टाईल्सवर शिंपडा आणि स्क्रबरच्या मदतीने टाईल्स साफ करा. याने टाईल्स चकचकीत निघतील.

ब्लीच आणि लिंबाचा करा वापर

स्वयंपाक घरातील घाणेरडे टाईल्स साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करा. यासाठी एका वाटीत २ कप ब्लीच घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर जुन्या कापडाने व तयार मिश्रणाने टाईल्स साफ करून घ्या. कापडाने फरशी चांगली घासून काढा. या मिश्रणाच्या मदतीने टाईल्सला नवीन चमक मिळेल. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही हातमोजे वापरून टाईल्स साफ करू शकता.

लिंबाच्या सालीच्या मदतीने निघेल चिकटपणा

आपण लिंबाचा वापर करून सालं फेकून देतो, मात्र असे न करता आपण त्याचा वापर टाईल्स साफ करण्यासाठी करू शकता. यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि साले टाकून मिश्रण तयार करा. लिंबू चिकटपणा घालवण्यासाठी उपयुक्त आहे. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा, स्प्रे टाईल्सवर शिंपडा आणि स्क्रबरच्या मदतीने टाईल्स घासा. याने टाइल्स चमकतील.

Web Title: Got sticky-waxy kitchen tiles? Follow 3 Tips, Oily tiles will look shiny in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.