Join us  

'नीट साफ केलं नाही तर...'; मुख्याध्यापकांनीच शाळेतल्या पहिलीच्या मुलांना टॉयटेल धुवायला लावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 11:39 AM

School principal forced to clean toilet video viral : शाळेच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत विद्यार्थी शौचालयाची साफसफाई करताना दिसत आहेत.

कधी-कधी असं चित्र पाहायला मिळतं की विकासाच्या नावाखाली भारत प्रत्येक पावलावर दहा पावले मागे पडतो. भारतातील शिक्षण व्यवस्था अजूनही प्रगतीपथावर आहे. इंटरनेटवर दररोज अशा स्टोरीज पाहायला मिळतात ज्यामुळे सरकारी शाळांची दुरवस्था समोर येते. इंग्रजी माध्यमाच्या आणि हायफाय शाळांकडे पाहून आपल्या शाळेचीही अशी अवस्था व्हावी, अशी खंत वाटते. सध्या एका व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथिल एका  व्हिडिओमध्ये, प्राथमिक शाळेतील मुलांना त्यांच्या शाळेतील बाथरूम साफ करण्यास भाग पाडले जात आहे. (Government primary school principal forced to clean toilet video viral)

गुरुवारी एका जिल्हा प्राथमिक शाळेत मुलांना शौचालये स्वच्छ करण्यासाठी तयार केले जात असल्याचे चित्र समोर आले, त्यानंतर उत्तर प्रदेशातील बलिया येथील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्याचे जाहीर केले. फुटेजमध्ये मुले टॉयलेट साफ करताना दिसत आहेत तर एक माणूस त्यांना शिव्या घालत आहे.

मूलभूत शिक्षण अधिकारी मणिराम सिंह यांनी सांगितले की, बुधवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ सोहवण परिसरातील पिपरा कला प्राथमिक शाळेचा आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मूलभूत शिक्षण अधिकारी मणिराम सिंह यांनी सांगितले की, त्यांनी सोहवन विभाग शिक्षणाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल. (Government primary school principal forced to clean toilet video viral)

व्हिडिओमध्ये, ब्लॉक सोहवन मधील पिपरा गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत विद्यार्थी शौचालयाची साफसफाई करताना दिसत आहेत. मुख्याध्यापक उभे आहेत आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करायला लावत आहेत. याच घटनेच्या दुसऱ्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये प्राचार्य विद्यार्थ्यांना 'मी शौचालय बंद करीन, जर ते व्यवस्थित साफ केले नाही तर तुम्हाला घरी शौचास जावे लागेल' असे सांगताना ऐकू येते. नंतर क्लिपमध्ये, एक अल्पवयीन विद्यार्थी शौचालय स्वच्छ करण्यासाठी पाण्याने भरलेली बादली घेऊन येतो.

टॅग्स :सोशल व्हायरल