आजकालच्या डिजिटल युगात मोबाईलमुळे संपूर्ण जग हातात सामावले आहे. म्हणजेच सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हायरल होत असतं. काहा व्हायरल, फनी, व्हिडिओ पाहून हसणं कंट्रोल करता येत नाही. काही व्हिडिओज असे असतात जे पाहून आपण चकीत होतो. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. (Grand mother sitting at moped grandson perform stunt)
भरधाव वेगात बाईक चालवण्याची सवय नेहमीच महागात पडते... मग तो चालवणारा तरूण असो किंवा वृद्ध. काही लोक फक्त जोरजोरात एक्सलेटर दाबून दुचाकी किंवा स्कूटी रस्त्यावर चालवताना दिसतात. आपल्यासोबत अपघात होऊ शकतो याचीही त्यांना पर्वा नसते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरातील सदस्यही त्यांना थांबवत नाहीत. आता हा व्हिडीओ तुम्हीच बघा जिथे एक मुलगा त्याच्या आजीला घेऊन भरधाव वेगानं चालला आहे. हा व्हिडिओ पाहताना पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण त्याचा वेग पाहून कोणत्याही क्षणी अपघात होईल असं वाटतं.
मुझे लगता है दादी को ये आखिरी हवाई यात्रा तक पहुंचा के मानेगा 😂😂 pic.twitter.com/6bhRWfnLQa
— Hardika Yadav (@Hardika_Yadav) December 23, 2022
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सुमारे 10 वर्षांचा एक मुलगा आपल्या वृद्ध आजीला बसवून खूप वेगाने मोपेड चालवत आहे. हा वेग एवढा होता की थोडीशी चूक झाली असती तर म्हातारी आजी आणि मुलाला खूप दुखापत झाली असती. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका कार मालकानेही त्याला दुचाकीचा वेग कमी करण्याचा सल्ला दिला, मात्र त्या मुलाने त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत वेग वाढवला. या क्लिपमधील आश्चर्यकारक बाब म्हणजे आजीला बाईकच्या वेगाबाबत कोणतीही अडचण नव्हती.
आर्मी ऑफिसरनं निवृत्त होण्याआधी आईला ठोकला शेवटचा सलाम; पाहा व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ @Hardika_Yadav नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. १ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने सांगितले की, अपघाताची शक्यता आहे.' दुसरीकडे, दुसर्या युजरने लिहिले की, नातवाबरोबर आजीला बाईकवरून उडायला मिळाले! याशिवाय इतर अनेक यूजर्स यावर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.