Join us  

Grandmother Hoisted On The Drum : सलाम! ड्रमवर चढून झेंडा फडकवणाऱ्या आजींना पतीची साथ; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:29 AM

Grandmother Hoisted On The Drum : लोकांना हा फोटो खूप आवडला आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

आज देश आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने देशवासीय अभिमानाने हा दिवस संस्मरणीय करत आहेत. सध्या देशातील सर्व जनता घराघरात तिरंगा लावत आहे. हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. (Grandmother hoisted on the drum so the pride of the tricolor)

दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात एक वृद्ध जोडपे घराच्या छतावर तिरंगा फडकवत असल्याचे दिसून येते. आजी या तिरंग्याबद्दलचा आदर व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर लोक या फोटोला खूप पसंत करत आहेत. (Grandmother hoisted on the drum so the pride of the tricolor remained intact anand mahindra saluted)

हा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही विचार करत असाल की, स्वातंत्र्यदिनी इतका उत्साह का असतो.  तर या दोघांना विचारा. ते कोणत्याही व्याख्यानापेक्षा चांगले समजावून सांगतील. जय हिंद."

लोकांना हा फोटो खूप आवडला आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोला 1 लाख 36 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकांच्या प्रतिक्रिया या फोटोवर पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे- हा आपला खरा भारत आहे. त्याचवेळी, आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे - देश बदलत आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाप्रेरणादायक गोष्टीस्वातंत्र्य दिन