Lokmat Sakhi >Social Viral > आजींनी पहिल्यांदा चाखली नातवानं आणलेल्या फ्रेंच फ्राईजची चव; अन् 'अशी' रिअ‍ॅक्शन दिली

आजींनी पहिल्यांदा चाखली नातवानं आणलेल्या फ्रेंच फ्राईजची चव; अन् 'अशी' रिअ‍ॅक्शन दिली

Grandmother Taste French Fries : मॅकडोनाल्डमधून आणलेल्या फ्रेंच फ्राईजच्या प्रेमात त्याची आजी कशी पडली हे शेअर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:43 AM2022-06-29T11:43:32+5:302022-06-29T11:50:16+5:30

Grandmother Taste French Fries : मॅकडोनाल्डमधून आणलेल्या फ्रेंच फ्राईजच्या प्रेमात त्याची आजी कशी पडली हे शेअर केले आहे.

Grandmother Taste French Fries : Grandmother taste french fries viral video funny trending video instagram | आजींनी पहिल्यांदा चाखली नातवानं आणलेल्या फ्रेंच फ्राईजची चव; अन् 'अशी' रिअ‍ॅक्शन दिली

आजींनी पहिल्यांदा चाखली नातवानं आणलेल्या फ्रेंच फ्राईजची चव; अन् 'अशी' रिअ‍ॅक्शन दिली

आजी-आजोबा मुलांना खूप आवडतात आणि जेव्हा ते काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना पाहणे खूप मनोरंजक असते. अनेक वेळा, वृद्ध लोक त्यांच्या विशिष्ट खाण्यापिण्याच्या सवयींमुळे नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाहीत.  (Viral Video) इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असेच एक दृश्य दिसले ज्यामध्ये एका वृद्ध महिलेने सांगितले की तिला पेरी-पेरीसह फ्रेंच फ्राईज खूपच आवडले. (Grandmother taste french fries viral video funny trending video instagram)

आजींनी पहिल्यांदाच टेस्ट केले फ्रेंच फ्राईज विथ पेरीपेरी

जय पारीक यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. जय पारीक नावाच्या माणसाने मॅकडोनाल्डमधून (Mcdonald's) आणलेल्या फ्रेंच फ्राईजच्या प्रेमात त्याची आजी कशी पडली हे शेअर केले. त्यानं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा तुम्हाला कळले की तुमच्या आजीला पेरी पेरीपेरीसोबत फ्रेंच फ्राईज आवडतात.


व्हिडिओमध्ये, आजी पेरी पेरी मसालासोबत फ्रेंच फ्राई मिक्स करताना दिसत आहे जे तिच्या नातवाने तिच्यासाठी आणले होते. त्यानंतर आजी फ्रेंच फ्राईजचा आनंद घेताना दिसत आहेत. जेव्हा त्यांचा नात विचारतो की तू इन्जॉय करत आहेस का? यावर आजी 'हो' म्हणतात दृष्य खूपच छान आहे.

 पाऊस सुरू झाला अन् जोडपं रिक्षात जाऊन बसलं; नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्या व्यक्तीनं लिहिलंय की, एकदा आम्ही मॅकडोनाल्डच्या आऊटलेटमधून जात होतो त्यावेळी हे मील घेतले. त्यावेळी आजींनी नवीन पदार्थ ट्राय करायला नकार दिला. कारण आजींना काही निवडक पदार्थच खायला आवडतात. खूपवेळ समजवल्यानंतर आजी इतर पदार्थ खाण्यास तयार झाल्या.  

 

Web Title: Grandmother Taste French Fries : Grandmother taste french fries viral video funny trending video instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.