Join us  

अन् आजोबांनी या वयातही मायेनं पत्नीचे केस विंचरत केलं किस, पाहा प्रेमाचा क्यूट व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2022 4:16 PM

पाहा आजी-आजोबांच्या अतूट प्रेमाची झलक, या वयातही बॉंडींग कायम...

ठळक मुद्देइतकी वर्ष एकत्र राहिल्यावरही त्यांचे प्रेम आटलेले नाही हे पाहून पाहणाऱ्यांना खरंच छान वाटत आहे. एखाद्या लहान मुलाचे विंचरावे तसे त्यांचे केस विंचरुन त्याचा छान भांग पाडून देतात.

प्रेमाचे नवे नऊ दिवस गुलाबी असतात, पण एकदा ते जुनं झालं की मग गृहीत धरलं जातं. मात्र वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या प्रेमालीत ओलावा, एकमेकांप्रती असलेली माया कायम टिकवून ठेवणारे फार कमी जण असतात. अनेकदा आपण आपल्या वागणुकीने, बोलण्याने किंवा कधी अनादर केल्याने जोडीदाराला दुखावतो. तरुणपणी आपल्या अंगात त्राण असतो त्यामुळे आपण अनेक गोष्टी करु शकतो पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मात्र आपल्याला एकमेकांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आधारांची आवश्यकता असते. या वयात आपण थकलेले असल्याने आपल्याला प्रेमाची आवश्यकता असते. मात्र अशावेळी आपला जोडीदार आपल्या जवळ नसेल तर मात्र आपलं अवघड होतं. 

(Image : Google)

सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक आजोबा अतिशय प्रेमाने आपल्या पत्नीचे केस विंचरताना दिसत आहेत. बॉयकट असलेली ही पत्नी सोफ्याच्या खुर्चीत बसली आहे आणि आजोबा ब्रशने तिचे पांढरे झालेले केस छान विंचरत आहेत. इतकंच नाही तर केस विंचरताना ते आपल्या बायकोच्या डोक्यावर प्रेमाने कीसही करतात. त्यामुळे या दोघांमध्ये किती छान बॉंड असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. काही वेळा शब्द व्यक्त करु शकत नाहीत ती गोष्ट तुमच्या एखाद्या लहानशा कृतीतून सहज व्यक्त होते. इन्स्टाग्रामर हा क्यूट व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या वृद्ध जोडप्यामधील प्रेमाचे नेटीझन्स कौतुक करत आहेत. इन्स्टाग्रमावर हा व्हिडिओ १ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून या दोघांच्यातील अनोख्या बॉंडचे कौतुक होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओला आणि या दोघांमधील प्रेमळ नात्याला काही ना काही प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर या दोघांचे वय ७० ते ७५ वर्षांच्या पुढे असावे असे वाटते. 

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने आपण आज आपल्या आई-वडिलांचे हे सुंदर क्षण कॅमेरात कैद केले आहेत असे म्हटले आहे. मात्र त्याखाली डिमेन्शिया, अल्झायमर असे हॅशटॅगही देण्यात आले आहेत. त्यामुळे या आजींना यातील कोणतातरी आजार असणार असा अंदाज आहे. त्यामुळेच हे आजोबा इतक्या प्रेमाने आपल्या बायकोची सेवा करताना दिसत आहेत. सुरुवातीला हे आजोबा आपल्या पत्नीचे डोके एका कापडाने पुसतात. त्यानंतर आपल्या खिशातून एक कंगवा काढतात आणि एखाद्या लहान मुलाचे विंचरावे तसे त्यांचे केस विंचरुन त्याचा छान भांग पाडून देतात. आजी-आजोबा दोघांनीही अतिशय छानशी शर्ट पॅंट घातली असून आजी काहीतरी वाचन करत असल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. त्या आजीही अतिशय प्रेमाने हे सगळे करुन घेताना दिसतात. हे जोडपे परदेशी असावे असे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येत आहे. आयुष्यातील इतकी वर्ष एकत्र राहिल्यावरही त्यांचे प्रेम आटलेले नाही हे पाहून पाहणाऱ्यांना खरंच छान वाटत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलरिलेशनशिपरिलेशनशिप