प्रेम आंधळं असतं. आणि डोळे उघडले की ते आटतं असंही काहीजण म्हणतात (Social Viral). अखंड प्रेमात असलेल्यांचेही संसार तुटतात, ब्रेकअप होतात (Relationship). मरेपर्यंत साथ देईन असं वचन दिलं तरी सगळेच तसं करतात असं नाही. पण काहीजण तर मरेपर्यंतच नाही तर मेल्यावरही साथ देतात. एका तरुणीची ही अशीच गोष्ट. तिच्या प्रियकराचा कार अपघातात मृत्यू झाला.
पण तिचं त्याच्यावर इतकं प्रेम की आता तिनं त्याच्या आत्म्याशी लग्न करायचं ठरवलं आहे. काहींनी तिचं कौतुक केलं तर काही म्हणाले तिला सांगायला हवं की तो आता या जगात नाही, तुझं आयुष्य जग हा वेडेपणा करु नकोस(Grieving woman to hold ghost marriage with late boyfriend after tragic car accident).
ऐन तारुण्यात हाडं ठणकतात म्हणून डॉक्टरची बिलं भरता? फक्त ४ गोष्टी करा, हाडं होतील बळकट
नक्की प्रकरण काय?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार १५ जुलै रोजी तैवानमधील राष्ट्रीय महामार्गावर एक भयानक कार अपघात झाला. कारमध्ये चार लोक बसले होते. हाँग असं त्यांचं नाव. त्यातला एक यू नावाच्या तरुणीचा प्रियकर, त्याची बहीण आणि आणखी एक मित्र गाडीत होता. अपघात घडल्यानंतर चारही जण ढिगाऱ्याखाली अडकले. काही वेळानंतर यू ला शुद्ध आली. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असली तरी, तिने त्याची बहिण आणि मित्राला बाहेर काढले, त्यांना तात्काळ रुग्णालयातही नेले. परंतु, दुर्दैवाने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. प्रियकराला वाचण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण तो वाचू शकला नाही. आता तिने ठरवलं की तो नाही, पण मी त्याच्या आत्म्याशी लग्न करणार. त्याच्या आईचीही काळजी घेणार.
स्ट्रेस इतका की कामावर फोकसच करता येत नाही? योगगुरु सांगतात ५ उपाय, ताण होईल गायब
मृतांच्या शांतीसाठी भूतविवाहाची प्रथा
चीनमध्ये मृतांच्या शांतीसाठी भूतविवाहाची प्रथा ३००० वर्षांपूर्वी सुरू झाली होती. त्यांच्या मान्यतेनुसार, 'लग्न न करता किंवा त्यांच्या इच्छा अपूर्ण असताना व्यक्ती मरण पावली तर, त्यांना नंतरच्या जीवनात शांती मिळत नाही. त्यामुळे जिवंत व्यक्ती छायाचित्रासोबत लग्न करते.'