Join us  

लग्नात गळ्यात हार घालण्यापूर्वी नवरदेवाने मागितले खास गिफ्ट; लाजऱ्या नवरीने केला हट्ट पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 6:48 PM

Social viral: भर मंडपात होणाऱ्या नवरदेवाने भलतंच गिफ्ट मागितलं आणि ती लाजून लाजून लाल झाली.. वाचा नेमकं काय होतं ते गिफ्ट आणि नवरीने ते कसं दिलं...

ठळक मुद्देनवऱ्याचा प्रेमळ हट्ट आणि त्यानंतर तो हट्ट पुर्ण करणारी गोड नवरी या दोघांवर नेटकरी चांगलेच फिदा आहेत. 

लग्नघटिका जवळ आलेली. नवरदेव- नवरी दोघेही नटून- थटून बोहल्यावर चढलेले. नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमालाही घातली. आता अपेक्षित होतं की नवरदेवही नवरीच्या (bride and groom) गळ्यात वरमाला घालेल... पण झालं काही भलतंच... नवरीने जर माझा हट्ट पुर्ण केला, तरच मी तिच्या गळ्यात वरमाला (varmala) घालेल आणि लग्न करेल, असा हट्टच नवरदेव धरून बसला..... त्याचा हा हट्ट नवरीसाठी (bride kissing groom) खूपच अनपेक्षित होता...

 

त्याचं झालं असं की नुकताच एक लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. या लग्नाचा एक मजेशीर व्हिडियो (video) सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लग्न सोहळ्याचे जे वेडिंग प्लॅनर होते, त्यांनी हा व्हिडियो इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केला असून अवघ्या वीस तासांतच या व्हिडियोला हजारो लाईक्स मिळाले आहे. नेटकरी मंडळींना हा व्हिडियो चांगलाच आवडला आहे. बरं हा व्हिडियो परदेशातला मुळीच नाही. भारतातलाच हा लग्न सोहळा आहे. 

 

या व्हिडियोमध्ये असं दिसतंच की नवदेवाच्या हातात वरमाला असून नवरी वाट बघते आहे की तो तिच्या गळ्यात ती कधी घालेल. पण त्याच वेळी नवरदेव तिला खुणावतोय की आधी मला आता, इथे किस कर आणि त्यानंतरच मी तुझ्या गळ्यात वरमाला घालेल. भर मंडपात, सगळ्या पाहुण्यांसमोर नवऱ्याला किस कसं करायचं, म्हणून नवरी चांगलीच पेचात पडली आहे आणि खूपच लाजते आहे. पण शेवटी नवरदेव काही आपला हट्ट सोडायलाच तयार नाही, असं दिसलं तेव्हा ती लाजत मुरडत पुढे झाली आणि नवरदेवाच्या गालावर किस केलं. नवऱ्याचा प्रेमळ हट्ट आणि त्यानंतर तो हट्ट पुर्ण करणारी गोड नवरी या दोघांवर नेटकरी चांगलेच फिदा आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्नइन्स्टाग्राम