Join us  

लग्न पत्रिकेत वधू वराचं नाव लिहिताना 'असा' घोळ घातला, पत्रिका वाचणारेच झाले कन्फ्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 3:23 PM

Groom print such thing for the bride : हरियाणात एका कुटुंबाकडून हरयाणवी भाषेत कार्ड छापण्यात आले.

लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे पत्रिका छापून घेतो. आपल्या लग्नाची पत्रिक खूप खास असावी असं प्रत्येकालाच वाटतं. कधी कुणाचे लग्न ठरले की नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना आमंत्रित करण्यासाठी कार्ड छापले जातात. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लग्नपत्रिका छापताना घोळ घातले जातात. ते पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू फुलतं. (Groom print such thing for the bride on the wedding card guests got confused before coming)

अशा पत्रिका सोशल मीडियावर अपलोड केल्या जातात तेव्हा त्या व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. लग्नपत्रिकेवर लिहिलेल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.   हरियाणात एका कुटुंबाकडून हरयाणवी भाषेत कार्ड छापण्यात आले.

थंडीत कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढलाय? ५ पदार्थ खा, पोट राहील साफ, गॅसेसचा त्रासही होईल कमी

ही पत्रिका अनेक वर्षे जुनी  आहे, मात्र पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावर लिहिलेल्या गोष्टी वाचून लोकांना खूप आश्चर्य वाटत आहे. अनेकदा तुम्हाला लग्नपत्रिका फक्त हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच दिसतात, पण कार्डावर प्रादेशिक भाषेत लिहिलेले दिसत नाही. असेच काहीसे या कार्डमध्ये पाहायला मिळाले.

हरियाणातील एका कुटुंबानं या कार्डवर फक्त हरियाणवी भाषेत सर्व काही लिहिले आहे. कार्डमध्ये सर्वप्रथम गणेश महाराजांचा जयजयकार' असे लिहिले होते. यानंतर सर्व काही हरयाणवी भाषेत लिहिले आहे. अगदी वधू-वरांच्या नावापुढे छौरा, छौरी असे लिहिले आहे.

 थंडीत अंघोळ करण्याची निंजा टेक्निक; व्हायरल व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

गंमत म्हणजे फक्त नावच नाही तर पत्ता, कार्यक्रम आणि दिवस-तारीखही हरियाणवी भाषेत लिहिलेली आहे. ही लग्नपत्रिका 2015 सालची असल्याचे कार्डवर लिहिलेल्या तारखेवरून समजते.  हे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया