Gudi Padwa 2025 Special: चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. याला हिंदू नववर्ष म्हणूनही ओळखले जाते.(Gudhichi Saree stitching tutorial) हा दिवस महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण अनेक राज्यांमध्ये वसंत ऋतुचे आगमन आणि रब्बी पिकांची कापणी म्हणून साजरा करतात. (How to stitch Gudhi Padwa saree) या दिवसाच्या माध्यमातून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट प्रवृत्तीला रोखण्यासाठी दारोदारी गुढी उभारतात. (Simple Gudhi Padwa saree stitching tips)
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी काठी, फुलांचा हार, चांदीचा गढू, साखरेचा हार, कडुलिंब आणि आंब्याची डाहाळी लागते. तसेच गुढीला नवे कोरे वस्त्र चढवले जाते.(Easy Gudhi Padwa saree design) परंतु, अनेकदा आपल्याला गुढीचे वस्त्र निवडताना अधिक त्रास होतो. गुढीला लागणारे वस्त्र हे कधी अगदी लहान होते किंवा मोठे त्यामुळे आपल्याला कळतं नाही. काही सोप्या पद्धतीने आपण गुढीचे वस्त्र घरीच तयार करु शकतो. (Gudhichi saree draping for beginner)गुढीला लागणारे साहित्य आपल्याला सहज मिळते. सध्या अनेक नवीन पद्धतीच्या गुढी आणि त्यांचे वस्त्र बाजारात पाहायला मिळते. आपली गुढी देखील सर्वात युनिक आणि सुंदर दिसावी असे वाटतं असेल तर घरच्या घरी गुढीसाठी खणाची साडी कशी शिवायाची ते पाहूया. अवघ्या १० मिनिटांत तयार होणारे गुढीचे वस्त्र.(Step-by-step Gudhi Padwa saree stitching)
गुढी पाडव्यासाठी घरीच करा साखरेच्या गाठी, सोपी पद्धत - साखरेची माळ करा सुंदर
गुढीचे वस्त्र शिवण्यासाठी आपल्या आवडीच्या रंगाचे खणाचे वस्त्र दीड मीटर घ्या. कापड मेजरपट्टीने मोजून नीट व्यवस्थित पाहून घ्या. आता यामध्ये कापडाची लांबी २७ आणि रुंदी ६० अशी घेऊन व्यवस्थित कापून घ्या. कापड कापल्यामुळे त्याच्या आजूबाजूचे धागे दिसतील. अशावेळी त्याला बाजूने शिवून घ्या. ज्यामुळे धागे निघणार नाहीत. आता त्यावर लेस लावून शिवून घ्या. म्हणजे साडी अधिक आकर्षित दिसेल.
सात इंच लांबीला आणि काठाच्या बाजूने सात इंच असं मेजरपट्टीने मोजून खडूने मार्क करा. आता साडीच्या मिऱ्यांची घडी घालतो तशी घालून त्याला पिना लावा. खालच्या मिऱ्यांना व्यवस्थित सेट करुन एकदा इस्त्री करा. ज्यामुळे काठ अगदी सुरेख दिसेल. आता वरच्या मिऱ्यांना शिलाई मारुन घ्या. त्यानंतर २२ इंच लांबी आणि दीड इंच रुंदीचा कापड घेऊन त्याला दोनदा फोल्ड करा आणि शिलाई मारा. तीन बाय तीन इंचाचा चौकोनी कापड घेऊन त्याला त्रिकोणी आकार द्या.
वरच्या प्लेट्सचे मेजरमेंट तपासा त्यानंतर काठ असणारा कापड एक इंच जास्त घेऊन कापडाचे दोन तुकडे घ्या. त्यानंतर प्लेट्स तयार केलेल्या वरच्या भागाला दोन्ही कापड शिवून घ्या. तयार केलेल्या नॉड्स शिवून घ्या. गुढीच्या साडीचा मागच्या बाजूचा भाग पॉकेट सारखा तयार करा. ज्यामुळे त्यात काठी व्यवस्थित अडकवता येईल. अवघ्या १० मिनिटांत तयार होईल गुढीचे खणाचे वस्त्र.