चैत्र शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रासह अनेक राज्यात गुढीपाडवा अगदी थाटामाटात साजरा केला जातो.(Gudipadwa Rangoli designs with spoon) तसेच या दिवसापासून हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो. या दिवशी दारोदारी गुढी उभारली जाते. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. याशिवाय श्रीखंड पुरीचा बेत, घरभर फुलांचे तोरण आणि बाहेर सुरेख रांगोळी काढण्यात येते. (Easy Rangoli ideas using spoon)
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा संवत्सर पाडवो वा उगादी अशा विविध नावांनी ओळखला जातो.(Creative spoon rangoli patterns) या दिवशी महिलावर्ग दारात किंवा घराबाहेर मोठ्या रांगोळ्या काढातात. (Simple Gudipadwa rangoli techniques) जर आपल्यालाही ही सणानिमित्त खास गुढीची रांगोळी काढायची असेल आणि चिमटीत रांगोळी धरुन काढता येत नसेल तर आपण छाप्याने किंवा स्टिकर्स लावून रांगोळी काढतो.(Step-by-step rangoli design for Gudipadwa) पण आज आम्ही काही सोप्या टेक्निक सांगणार आहोत. स्वयंपाकघरात असणारा झारा आणि चमचा वापरुन आपण ५ मिनिटांत सुरेख रांगोळी काढू शकतो. झाऱ्याचा वापर करुन काढलेली रांगोळी दाराबाहेर शोभून दिसते. झाराचा वापर करुन रांगोळी कशी काढायची? पाहूयात काही सोपे आणि भन्नाट टेक्निक (DIY rangoli with spoon)
समर स्पेशल : कॉटनचे ‘वन पीस’ ड्रेसचे पाहा ट्रेण्डी पॅटर्न, ऑफिसलाही घालून जाऊ शकता रोज!
रांगोळी काढण्यासाठी आपल्याला झारा आणि ४ चमचे लागतील. सर्वात आधी झारा उलटा ठेवून चार चमचे गुढीला साडी नेसतो त्याप्रमाणे ठेवा. आता निळा रंग वापरुन सगळ्यात आधी चमचाच्या मदतीने साडीची झालर तयार करा. आता झाऱ्याच्या आजूबाजूला रंग घालून कलशाचा आणि काठीचा आकार तयार करा. यामध्ये आपण आपल्या आवडीचे रंग भरु शकतो. ज्यामुळे रांगोळी अधिक आकर्षक दिसेल.
आता रांगोळी भोवती पसरलेले रंग हलक्या हाताने पुसून घ्या. आता कलशाच्या मध्ये पिवळा रंग भरून लाल रंगाने स्वस्तिक काढा. गुढीच्या साडीमध्ये आवडीचे रंग देऊन त्याची बॉर्डर तयार करा. बॉर्डर तयार करताना आपण पिनांचा वापर करु शकतो. आता पिवळ्या आणि नारंगी रंगाचा वापर करुन आपण हार बनवू शकतो. कलशाच्या भोवती फुलांचा हार, साखरेच्या गाठी आणि हिरवी पाने काढू शकता. ज्यामुळे गुढीला सुंदर लूक येईल. याप्रकारे तयार होईल सुंदर-सिंपल अवघ्या ५ मिनिटांत गुढीची रांगोळी.