सध्या लग्नाचा सिजन सुरू आहे, सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओज व्हायरल असतात. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जे पाहून तुम्हालाही आश्चर्ईय वाटेल.(Roti Video Shows Wedding Guests Preparing Their Own Rotis) सोशल मीडियावर नेहमीच नवीन ट्रेंड व्हायरल होत असतात जो पाहून काहीवेळा आनंद होतो तर कधी राग अनावर होतो. सोशल मीडियावर सध्या एका हाय क्लास लग्नाचा फोटो व्हायरल होत आहे. (Make Your Own Roti Video Shows Wedding Guests Preparing Their Own Rotis)
या व्हिडिओमध्ये लग्नासाठी आलेले पाहूणे काऊंटवर स्वत: चपात्या बनवत आहेत. ही खूप आश्चर्यकारक घटना आहे कारण भारतीय लग्नांमध्ये नेहमी पाहूण्यांना सर्व काही हातात तयार दिलं जातं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोक या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरनं लिहिलं, 'जर स्वत: चपात्या बनवायच्या आहेत तर मी लग्नाला कशाला जाऊ घरीच खातो.' तर अजून एका युजरने गमतीदार कमेंट केली की, 'याचा अर्थ आळशी लोक कमी जेवतील.' (Guest seen making roti in wedding as new high class marriage trends video goes viral)
लग्नाला याल तर चपात्या कराव्या लागणार?
या व्हिडिओमध्ये एक हाय क्लास फॅमिलीचे लग्न दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. पाहूणे फूड स्टॉलवर थाळी घेऊन उभे आहेत आणि स्वत: रोट्या बनवत आहेत. कुणीतरी पार्टी दिली आणि तिथे जाऊन स्वत:हून रोट्या भाजाव्या लागल्या, अशी स्थिती आजपर्यंत कुणी पाहिली नाही. सामान्यतः भारतीय लग्न-सोहळ्यांमध्ये पाहुण्यांसाठी सर्व खाद्यपदार्थ तयार ठेवले जातात, परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतापले आणि कमेंट करू लागले.
साऊथचे लोक दिवसरात्र भात खातात तरी पोट का सुटत नाही? पाहा भात खाण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @WokePandemic नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मोठ्या लोकांच्या पार्ट्यांमध्ये नवीन ट्रेंड, स्वतःला चपाती खायची असेल तर स्वत:च बनवा.' व्हिडीओच्या हेडिंगमध्ये लिहिले आहे- 'मी लग्नाला आलोय हे विसरलो होतो. व्हिडिओ लिहिपर्यंत 19 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.'