Join us  

अबब! ९ फुट उंच हेअरस्टाईल...सर्वात उंच हेअरस्टाईलसाठी गिनिज बुकमध्ये नोंद, अनोखे रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 12:28 PM

Guinness World Record of Making Highest Braid of 9 Feet : उंचच्या उंच असणारी हे हेअरस्टाईल एखाद्या ख्रिसमस ट्रीप्रमाणे दिसत आहे.

ठळक मुद्देजागतिक रेकॉर्डसाठी कोण काय विक्रम करेल सांगता येत नाही...९ फूट उंच हेअरस्टाईल तुम्ही कधीच पाहिली नसेल, पाहा हा व्हिडिओ...

लोक काय करतील आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवतील सांगता येत नाही. कोणी कधी एखाद्या पदार्थाचे रोकॉर्ड करतो तर कोणी आणखी काही विक्रम करुन रेकॉर्ड करतो. तसाच आता एका हेअरस्टायलिस्टचने सर्वात उंच हेअरस्टाईल करुन जागतिक विक्रम केला आहे. हा विक्रम साधासुधा नसून या हेअरस्टायलिस्टने चक्क ९ फूट उंचीची हेअरस्टाईल तयार केली आहे. महिलेच्या डोक्यावर असलेली ९ फूट उंचीची हेअरस्टाईल पाहून आपणही चकीत होऊ. मात्र अशाप्रकारचा अजब विक्रम करत या हेअरस्टायलिस्टने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे (Guinness World Record of Making Highest Braid of 9 Feet). 

गिनिज बुकच्या इन्स्टाग्राम पेजवर याविषयीची माहिती देण्यात आली असून त्यावर या हेअरस्टाईलचा व्हिडिओही अपलोड करण्यात आला आहे. या स्टायलिस्टचे नाव दानी हिसवानी असून त्या दुबईच्या आहेत. मागील ७ वर्षांपासून त्या हेअर स्टायलिंगच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या नावावर हा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. ही हेअरस्टाईल तयार करण्यासाठी त्यांनी खोटे केस आणि विविध प्रकारची साधने वापरली असल्याचे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते. या महिलेच्या डोक्यावर हेल्मेट घालून हेअरस्टाईल करण्याची सुरुवात करताना दिसतात. त्यानंतर ही हेअरस्टाईल सजवण्यासाठी त्यावर विविध प्रकारचे डेकोरेशन आणि लाईटच्या माळा असे काही लावण्यात येते. उंचच्या उंच असणारी हे हेअरस्टाईल एखाद्या ख्रिसमस ट्रीप्रमाणे दिसत आहे. 

 

 

 

ज्यांचे केस लांब असतात त्यांना ते धुण्यासाठी, बांधण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला माहित आहे. या केसांची हेअरस्टाईल काय करावी असा प्रश्नही अनेकदा मोठे केस असणाऱ्यांना पडतो. कधीतरी सणावाराला किंवा लग्नसमारंभांच्या निमित्ताने आपण नेहमीपेक्षा वेगळी हेअरस्टाईल करतो. पण अशाप्रकारे ९ फूट उंचीची हेअरस्टाईल करुन या हेअरस्टायलिस्टने एक आगळावेगळा विक्रम रचला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हजारो जणांनी या हेअरस्टाईलला लाईक करत त्याचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियागिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड