भारतीय स्त्रियांच्या बाबतीत जिवणी म्हणजेच ओठांच्या दोन्ही बाजुंच्या टोकांमधलं अंतर जेवढं नाजूक किंवा कमी असतं, तेवढं ते अधिक सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे जिवणी ही सहसा नाजूकच असावी, असा समज आपल्याकडे आहे. पण इथे तर या अमेरिकन महिलेच्या बाबतीत जरा वेगळंच आहे. तिची जिवणी एवढी मोठी आहे की त्यामुळेच तिची नोंद चक्क गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) घेतली असून ती आज तिच्या भल्या मोठ्या तोंडाच्या आकारामुळेच ( Largest mouth gap female of the world) जगभरात प्रसिद्ध झाली आहे.
सामंथा राम्सडेल (Samantha Ramsdel) असं या महिलेचं नाव असून ती अमेरिकेतील एक टिकटॉक स्टार आहे. तिला पाहिल्यावर तिच्या ओठांमधलं अंतर वाढून ते एवढं मोठं होत असेल, असं कुणालाही वाटत नाही.
साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा
पण जेव्हा ती तोंड उघडते आणि एकेक वस्तू तोंडात घालू लागते तेव्हा तिचा जबडा केवढा प्रचंड मोठा आहे, याचा अंदाज येतो. तिच्या दोन्ही ओठांमधलं अंतर तब्बल ६. ५२ सेमी एवढं मोठं होऊ शकतं. याच गोष्टीची नाेंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून तिला 'सगळ्यात मोठा जबडा असणारी महिला' म्हणजेच 'Largest mouth gap (female)' म्हणून प्रमाणपत्र दिलं आहे.
guinnessworldrecords यांच्यावतीने सामंथाचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती कोणकोणत्या गोष्टी सहज तिच्या तोंडात घालू शकते, हे दाखवलं आहे.
बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली
एक अख्खं सफरचंद, मोठ्या आकाराचं बर्गर हे न चावता जसंच्यातसं ती तिच्या तोंडात ठेवते. तिचा हा व्हिडिओ खरोखरंच बघण्यासारखा असून आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा अनेक वस्तू ती पुर्णच्या पुर्ण तोंडात कोंबते. Will it fit? असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं असून तिचा हा व्हिडिओ जगभर चांगलाच व्हायरल झाला आहे.