लोक एखाद्या कारणामुळं झालेल्या भांडणाचा किंवा दग्याचा सूड घेण्यासाठी काय करतील काहीच सांगता येत नाही. अशीच एक सूडाची धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबादमधून समोर आली आहे. अहमदाबाद पोलिसांनी शनिवारी साबरमती भागात पार्सल बॉम्ब स्फोटाप्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. रूपेन राव नावाच्या ४४ वर्षीय व्यक्तीने या स्फोटाचं प्लॅनिंग केलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने घटस्फोट घेतलेल्या पत्नीच्या परिवाराचा सूड घेण्यासाठी हे सगळं केलं.
पोलिसांनुसार, आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर राव याने सासरे, मेहुणा आणि पत्नीचा मित्र सुखाडियाचा सूड घेण्याचा प्लान केला होता. पत्नीचा मित्र सुखाडिया, सासरे आणि मेहुण्याला तो घटस्फोटासाठी जबाबदार मानत होता. धक्कादायक बाब म्हणजे सूड घेण्यासाठी बॉम्ब बनवणं ऑनलाईन शिकला.
शनिवारी सकाळी १०.४५ मिनिटांनी साबरमतीमधील एका रो हाऊसमध्ये बॉम्ब स्फोट झाला. ज्यात दोन व्यक्ती जखमी झाले. स्फोटानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी असलेल्या गौरव गढवी नावाच्या व्यक्तीला अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलांसने खोलवर चौकशी केली. ज्यामुळे शनिवारी रात्री राव आणि त्याचा मित्र रोहन रावल याला अटक करण्यात आली. पोलिसांनुसार, राव अनेक महिन्यांपासून या स्फोटाचं प्लानिंग करत होता. राव याचा उद्देश सुखाडिया आणि त्याच्या सासरच्या लोकांना नुकसान पोहोचवणं हा होता.
अटकेनंतर पोलिसांनी एका कारमधून दोन अॅक्टिव बॉम्ब ताब्यात घेतले. सल्फर पावडर, बारूद आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या माध्यमातून दुरून बॉम्बचा स्फोट करण्यात आला होता. पोलिसांनी एक पिस्तुलही सापडली, जी राव याने स्वत: बनवली होती.