गुलाबजाम आणि भजी हे दोन स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व असणारे पदार्थ. हे दाेन पदार्थ खाण्याची आणि त्यांचा आस्वाद घेण्याची वेळदेखील वेगवेगळी असते. त्यांच्या चवीमध्येही जमीन- आस्मानचं अंतर. एक त्याची मिठास जपून आहे, तर दुसरा अतिशय खमंग आणि झणझणीत. मग असं असताना, हे दोन पदार्थ एकमेकांपासून एवढे वेगळे असताना त्यांना एकत्र आणण्याचा खटाटोप का करता, असा प्रश्न खवय्यांना पडला आहे (Viral Video Of Gulabjam Vada). सध्या सोशल मिडियावर व्हायरल असणारा हा गुलाबजाम वडा किंवा गुलाबजाम भजी नावाचा पदार्थ नेमका कसा केला जातो, तो एकदा बघाच..(weird food combination)
कसा केला गुलाबजाम वडा?
काही दिवसांपुर्वी काजुकतली वडा नावाचा पदार्थ व्हायरल झाला होता. आता हा गुलाबजाम वडा व्हायरल होत आहे. आपण आलुवडा करतो. किंवा कांदा, बटाटा, मिरच्या घालून भजी करतो. हे पदार्थ करताना बटाट्याचं सारण किंवा कांदा, बटाटा, मिरच्या हे पदार्थ बेसनामध्ये घोळले जातात आणि नंतर तळले जातात.
क्रिती सेनन सांगते तसं कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात....
चक्क अशाच पद्धतीचा प्रयोग गुलाबजामसोबत केला आहे. foodb_unk या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा वडा नेमका कुठे तयार केला जातो, याची माहिती त्या पेजवर उपलब्ध नाही.
मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना 'हे' पदार्थ खाऊ घाला- सुपर कम्प्युटरसारखं पळेल डोकं...
आता ही रेसिपी पाहून तुम्हाला हा पदार्थ खावा वाटला, तर नक्कीच तुम्ही ती रेसिपी घरी ट्राय करू शकता. भजी आणि गुलाबजाम एकत्र खाण्याचा आनंद हवा असेल तर हा प्रयोग करून पाहा.