Lokmat Sakhi >Social Viral > दगडाने लागते दही, विरजणाचे काम करणारा खास दगड, हा चमत्कार की विज्ञान?

दगडाने लागते दही, विरजणाचे काम करणारा खास दगड, हा चमत्कार की विज्ञान?

एका दगडाच्या सहाय्याने दुधाचं दही होतं असं कोणी सांगितलं तर खरं वाटेल? पण हे खरं आहे. हाबुर नावाच्या दगडाने दुधाचं दही करता येतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 04:53 PM2022-02-18T16:53:35+5:302022-02-18T17:01:54+5:30

एका दगडाच्या सहाय्याने दुधाचं दही होतं असं कोणी सांगितलं तर खरं वाटेल? पण हे खरं आहे. हाबुर नावाच्या दगडाने दुधाचं दही करता येतं.

Habur stone, a special stone used for making curd from milk.. is it a miracle or a science? | दगडाने लागते दही, विरजणाचे काम करणारा खास दगड, हा चमत्कार की विज्ञान?

दगडाने लागते दही, विरजणाचे काम करणारा खास दगड, हा चमत्कार की विज्ञान?

Highlightsहाबुर हा दगड दुधाचं दही करणारा दगड म्हणून ओळखला जातो. हाबुर दगड वापरुन दुधाचं दही करताना विरजणाची गरज नसते.दुधाचे दही होण्यासाठी जे आवश्यक घटक असतात त्यातले अनेक घटक हाबुर दगडात असतात. 

घरी विरजलेलं ताजं दही आरोग्यदृष्ट्या खूप फायदेशीर असतं. केवळ आरोग्यासाठी नाही तर सौंदर्यासाठीही दही महत्त्वाचं असतं. पण घरी दही करणं ही साधी वाटणारी बाब अनेकदा अवघड होते. त्याचं कारण बाहेर विकत मिळतं तसं दही घरी विरजलं जात नाही. विरजण कितीही चांगलं असलं तरी दह्याची चव काही केल्या येत नाही. अशा परिस्थितीत कोणी सांगितलं , की दह्याला विरजणाची गरज नसते तर विश्वास बसेल? एका दगडाच्या सहाय्याने दुधाचं दही होतं असं कोणी सांगितलं तर खरं वाटेल? पण हे खरं आहे. हाबुर नावाच्या दगडाने दुधाचं दही करता येतं.

Image: Google

हाबुर दगड

हाबुर नावाचा दगड आपण कदाचित पहिल्यांदा ऐकत असू , पण हा दगड केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहे. पर्यटक राजस्थान फिरायला जातात तेव्हा जैसलमैर पासून 40 कि.मी अंतरावरील हाबुर या गावात अवश्य भेट देतात. दगडाला हाबुर हे नाव हाबुर गावाच्या नावावरुनच पडलं आहे. दही करणारा दगड, स्वर्णगिरी दगड म्हणूनही हाबुर दगड ओळखला जातो. दुधाचं दही करणाऱ्या या दगडाचा उपयोग भांडी तयार करण्यासाठी केला जातो.

Image: Google

हजारो वर्षांपूर्वी जैसलमेर येथे समुद्र होता. नंतर या समुद्रातलं पाणी सुकलं. समुद्रातील जीवांचं रुपांतर जीवाश्मात झालं. डोंगर तयार झाले. या डोंगरातूनच हाबुर दगड निर्माण झाला. या दगडापासून खनिजांची निर्मिती केली जाते असा इतिहास राजस्थानमध्ये हाबुरबाबत सांगितला जातो.

Image: Google

हाबुर दुधाचं दही कसं करतो?

हाबुर दगडामुळे दुधाचं दही तयार होतं. दही तयार होण्यासाठी 14 तास लागतात. दूध गरम करुन ते थोडं गरम असतानाच दुधात हाबुर दगड घातला जातो. भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर दगड दुधात ठेवला जातो. सकाळी हा दगड दुधातून काढला जातो. या दगडाच्या सहाय्याने दुधाचं कवडीदार दही तयार होतं. विना विरजण केवळ दगडाच्या सहाय्यानं दही लागतं हे बघून या दगडाला लोकं चमत्कारी दगड म्हणू लागले. पण नंतर या दगडाचा वैज्ञानिक अंगानं अभ्यास करण्यात आला तेव्हा हाबुर दगडापासून दही होतं यामागे शास्त्रीय कारण असल्याचं सिध्द झालं. 

Image: Google

दुधाचं दही होण्यासाठी 100 घटकांची आवश्यकता असते. असे अनेक घटक हाबुर दगडात उपलब्ध असल्याने हाबुर दगड गरम दुधात घातला की काही तासांनी दुधाचं दही होतं.  हाबुर दगडात बायो केमिकल, अमिनो ॲसिड, फिनायल एलिनिया, रिफ्टोफेन टायरोसीन हे विकर असतात. हे घटक दुधाचं दह्यात रुपांतर करतात. 

हाबुर दगड जैसलमेर येथे मिळतो. हाबुर गावातही विकला जातो. तसेच ऑनलाइन साइटवरही हा दगड उपलब्ध आहे. हाबुर या दगडापासून बाउल तयार केले जातात. कर्ड बाउल म्हणूनही ते उपलब्ध्द असून एका बाउलची किंमत् 800 रुपये आहे. या बाउलमध्ये गरम दूध घालून ते सकाळपर्यंत झाकून ठेवलं जातं. या बाउलमध्ये दुधाचं दही होतं. म्हणून या बाउलला कर्ड बाउल म्हटलं जातं. 
 
  
 

Web Title: Habur stone, a special stone used for making curd from milk.. is it a miracle or a science?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.