प्रवास म्हटला की सोबत सामान नेणं आलंच. प्रवासात घालायला वेगवेगळे कपडे, त्यावरच्या चपला, दागिने, गॉगल, टोपी असं एक ना अनेक. त्यातही खाऊ, रोजच्या गरजेच्या वस्तू असं करुन भरपूर साठत जातं. मग शेवटी आपली बॅग इतकी मोठी होते की ती आपल्याला उचलणेही शक्य होत नाही. प्रवासाला जाताना नेमकं आणि मोजकं सामान घ्यावं हे माहित असलं तरी हे लागेल, ते लागेल करुन महिला वर्ग भरपूर सामान घेतात. मात्र त्यातले बरेचसे सामान आहे तसेच परत येते. एकतर इतके सामान उचलणे शक्य होत नाही आणि अनेक गोष्टींची गरज नसताना आपण ते कॅरी करुन आपली शक्ती वाया घालवतो. आता यावर उपाय काय (Hack To Carry Extra Luggage In Viral Video) ?
असं जर तुम्हाला वाटत असेल तर एका महिलेने यावर भन्नाट उपाय शोधून काढला आहे. तिच्या या उपायामुळे आपल्या बॅगची जागा वाचेल आणि कमीत कमी जागेत जास्त सामान बसू शकेल. तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या महिलेने जास्त सामान कमी जागेत बसवण्यासाठी एक सोपी ट्रीक दाखवली आहे. ही महिला एका पातळ अशा पॉलिथीनमध्ये काही कपडे भरते. त्यामुळे पॉलिथीनचा आकार खूप मोठा होतो आणि त्यामुळे खूप जागा व्यापली जाणार असं आपल्याला वाटतं. पण खरी गंमत तर त्याच्या पुढे आहे. ही महिला या पॉलिथीनमध्ये कपडे घालून त्यामध्ये व्हॅक्यूम क्लीनरने हवा भरताना दिसते. त्यामुळे अचानक ही पिशवी दाबली जायला लागते आणि अतिशय लहान होते.
ये तकनीक ज़्यादा सामान साथ ले जाने वालों के लिए वरदान साबित हो सकती है pic.twitter.com/7CZeGVpTJ4
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) October 14, 2022
अशाप्रकारे कपडे भरुन बॅगमध्ये ठेवल्यास बऱ्याच गोष्टी एकावेळी सहज बॅगमध्ये राहू शकतात. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला जास्त सामान सोबत नेणाऱ्यांसाठी हे टेक्निक म्हणजे वरदान आहे अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. शुभंकर मिश्रा या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून तो आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. अनेकांनी त्यावर चांगली आयडीया असल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.