हिवाळ्यात वातावरण फारच थंड असते. या ऋतूत हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण लोकरीच्या गरम कपड्यांचा वापर करतो. थंडीत लोकरीपासून तयार केलेले (Hack to loosen up tight sweaters) स्वेटर, शाल, मफलर यांसारख्या अनेक उबदार कपड्यांचा वापर आपण करतो. एरवी वर्षभर कपाटात किंवा बॅगेत पॅकिंग ( Best Way to Stretch a Wool Sweater) करुन ठेवलेले लोकरीचे स्वेटर आपण हिवाळ्यात (How to stretch your sweaters properly) बाहेर काढतो. वर्षभर तसेच पॅकिंग करुन ठेवलेले स्वेटर आपण आधी स्वच्छ धुवून, वाळवून मगच वापरायला काढतो. किंवा थंडीच्या दिवसांत देखील सतत वापरुन स्वेटर खराब झालेच तर आपण ते धुतो. परंतु असे लोकरीचे गरम कपडे एकदा धुतल्यानंतर काहीवेळा आकसतात(How To Stretch Shrunken Sweaters).
आपण अनेकवेळा पाहिले असेलच की, लोकरीचे स्वेटर किंवा उबदार कपडे एकदा धुतल्यानंतर थोडे आकसतात. स्वेटर आकसल्याने ते आपल्याला व्यवस्थित बॉडी फिटिंगमध्ये बसत नाही. स्वेटर धुतल्यानंतर आकसल्याने त्याची साईझ आहे त्यापेक्षा कमी होते. असे शरीराला एकदम घट्ट किंवा अंगाला चिकटून बसणारे स्वेटर घालणे अनेकदा शक्य होत नाही. अशा या स्वेटरची जुनी फिटिंग पुन्हा पहिल्यासारखी कशी करावी असा प्रश्न पडतोच. यासाठीच आपण एका सोप्या घरगुती ट्रिकचा वापर करणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने आपण अगदी १० मिनिटांत आपल्या आकसलेल्या लोकरी स्वेटरची फिटिंग पुन्हा पहिल्यासारखी करु शकता. धुतल्यानंतर आकसललेया लोकरी स्वेटरची फिटिंग पुन्हा होती तशीच करण्यासाठीची खास टीप.
लोकरीचे स्वेटर धुतल्यानंतर त्याची फिटिंग बिघडून ते जास्तीच घट्ट होत असेल तर...
स्वेटर धुतल्यानंतर काहीवेळा लोकरीचे धागे आकसले जाऊन त्याची फिटिंग खराब होते, किंवा त्याची साईझ लहान होऊन ते आपल्याला खूप घट्ट होते. अशावेळी करावा असा सोपा घरगुती उपाय पाहूयात. mommywithatwist या इंस्टाग्राम अकाऊंटवरून धुतल्यानंतर आकसलेले लोकरीचे स्वेटर परत पहिल्यासारखे फिटिंगमध्ये कसे करायचे यासाठी एक सोपा उपाय शेअर करण्यात आला आहे.
सर्वात आधी एका बादलीत पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून कोणत्याही प्रकारचे हेअर कंडिशनर घालावे. कंडिशनर पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून घ्यावे. त्यानंतर त्यात हे फिटिंग बिघडलेले स्वेटर घालूंन ३० मिनिटे व्यवस्थित कंडिशनरचा पाण्यांत भिजवून घ्यावे. या उपायामुळे लोकरीच्या कपड्यातील फायबर्स लूज पडण्यास अधिक मदत होते.
३० मिनिटांनंतर, सर्वात आधी एक टॉवेल घेऊन तो व्यवस्थित सपाट पृष्ठभागांवर नीट अंथरून घ्यावा. त्यानंतर हे कंडिशनरच्या पाण्यांत बुडवून ठेवलेले स्वेटर न पिळताच या टॉवेलवर सरळ सपाट राहील असे नीट अंथरुन घ्यावे. त्यानंतर या टॉवेलची गुंडाळी करत स्वेटरमधील जास्तीचे पाणी काढून घ्यावे.
काही केल्या केसांची वाढच होत नाही? वापरा चमचाभर 'ही' आयुर्वेदिक पावडर, केस होतील लांबसडक-दाट...
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
स्वेटरमधून जास्तीचे पाणी निथळून गेल्यानंतर साधारणतः ५ मिनिटांनी टॉवेलचा गोलाकार रोल उघडून, स्वेटर आपल्याला ज्या भागात लूज किंवा लांब करायचे आहे त्या भागातून हातांनी हलकेच ओढून घ्यावे. उदाहरणार्थ :- जर आपल्याला स्वेटर कमरेत टाईट होत असेल तर स्वेटरच्या आडव्या दोन्ही बाजूला ओढून घ्यावे. जर स्वेटर लांबीला शॉर्ट होऊन फारच तोकड होत असेल तर स्वेटर खालच्या दिशेने उभे ओढून घ्यावे. यानंतर स्वेटर संपूर्णपणे वाळवण्यासाठी ठेवून द्यावा. अशाप्रकारे आपण धुतल्यानंतर जर लोकरीचे स्वेटर आकसून अधिक जास्त घट्ट किंवा शॉर्ट होत असेल तर आपण नक्कीच या एका सहज सोप्या पद्धतीने स्वेटरची बिघडलेली फिटिंग पुन्हा पहिल्यासारखी करु शकता.