Join us

एकमेकात अडकलेले वाट्या-डबे-वाडगे कसे काढायचे? ही घ्या १ सोपी युक्ती-झटपट स्मार्ट काम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2024 12:31 IST

Hack To Open Up Two Stuck Utensils : Kitchen Hacks : How To Remove 2 Stuck Vessels : Easy Removal Of Stuck Utensils Under 1 Minute : How can you separate two stainless steel bowls that are stuck to each other : रोजच्या वापरातील भांडी एकमेकांत अडकून बसली तर ती काढण्यासाठीची झटपट ट्रिक...

आपल्या किचनमध्ये नेहमीच्या वापरातील भांडी आपण व्यवस्थित लावून ठेवतो. भांड्यांच्या स्टँडवर किंवा आजकाल किचनमध्ये भांडी ठेवण्यासाठी ड्रॉवर तयार केले जातात त्यात आपण ही भांडी नीट एका शेजारी एक (Hack To Open Up Two Stuck Utensils) अशी लावून ठेवता. परंतु बरेचदा अनेक गृहिणींना हा अनुभव आला असेल की किचनमधील (Easy Removal Of Stuck Utensils Under 1 Minute) काही भांडी ही एकमेकांत अडकून बसतात. शक्यतो आपण टोप, वाट्या, डबे ठेवताना ते एकातएक घालून ठेवतो. परंतु काहीवेळा या भांड्यांच्या वेगवेगळ्या आकारानुसार आणि साईझ प्रमाणे ही (How can you separate two stainless steel bowls that are stuck to each other) भांडी व्यवस्थित ठेवली नाही तर ती एकमेकांत अडकून बसतात. अशाप्रकारे भांडी एकमेकांत अडकून बसली तर ती काढणे अवघड जाते.

काहीवेळा आपण ही एकमेकांत अडकून बसलेली भांडी काढण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु ही भांडी काही निघता निघत नाहीत. अशावेळी ही रोजच्या वापरातील भांडी एकमेकांत अडकून बसली तर ती काढायची कशी यासाठी आपण एका सोप्या ट्रिकचा (Kitchen Hacks) वापर करु शकतो. ही ट्रिक नेमकी कोणती आणि या ट्रिकचा वापर कसा करायचा ते पहा. घाईगडबडीत जर चुकून किचनमधील रोजच्या वापरातील भांडी एकमेकांत अडकून बसली तर ती काढण्यासाठीची सोपी ट्रिक पाहूयात. 

रोजच्या वापरातील भांडी एकमेकांत अडकून बसल्यास कशी काढावीत? 

किचनमधील रोजच्या वापरातील भांडी एकमेकांत अडकून बसली असतील तर ती काढण्यासाठीची सोपी ट्रिक mommywithatwist या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. एकदा का ही दोन भांडी एकमेकांत अडकून बसली की निघता निघत नाहीत अशावेळी ही एक सोपी झटपट ट्रिक उपयोगी पडू शकते. या ट्रिकसाठी तुम्हाला ग्लासभर पाणी आणि चमचाभर तेल इतके साहित्य लागणार आहे. 

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

मेहनत न करता वॉशिंग मशीनमध्ये उशा धुण्याची पाहा भन्नाट ट्रिक, हट्टी डाग गायब-उशी दिसेल नवीकोरी...

किचनमधील दोन भांडी जर एकमेकांत अडकून बसली असतील तर, सगळ्यात आधी ग्लासभर पाणी घेऊन जी दोन्ही भांडी एकमेकांत अडकली आहेत त्या दोन्ही भांड्यात थोडे थोडे पाणी ओतून घ्यावे. त्यानंतर या दोन्ही भांड्यांच्या वरच्या बाजूच्या कडांना ब्रश किंवा बोटांच्या मदतीने थोडे तेल लावून घ्यावे. त्यानंतर ही दोन्ही भांडी गॅसच्या मंद आचेवर ठेवून ३ ते ५ मिनिटे व्यवस्थित गरम करून घ्यावी. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून भांडी खाली उतरवून घ्यावीत. त्यानंतर ही भांडी थोडी गरम असतानाच कापड हातात धरुन कापडाच्या मदतीने एकमेकांत अडकलेली दोन्ही भांडी काढण्याचा प्रयत्न करावा. तेलाचा चिकटपणा आणि पाण्याची गरम वाफ यांच्या मदतीने अगदी सहजपणे एकमेकांत अडकलेली भांडी निघण्यास मदत होईल. अशाप्रकारे ही सहजसोपी ट्रिक वापरुन आपण किचनमधील भांडी एकमेकांत अडकली असतील तर पटकन काढू शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स