किचन (Kitchen) स्वंयपाकघराचा असा एक भाग आहे जो साफ-स्वच्छ राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक किचन खराब झाल्यामुळे पोट खराब होणं,बॅक्टेरियांचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो. म्हणून किचनमध्ये जेवण बनवण्यापासून, साफ-सफाईपर्यंत सर्व साहित्य स्वच्छ असायला हवं. (Genius Cleaning Hacks For a Sparking Kitchen) काही गोष्टी रोज साफ करणं कठीण असतं. जसं की किचन काऊंटर, किचनमध्ये ठेवलेल्या वस्तूंमुळे किचन काऊंटर लवकर खराब होते. (Kitchen Cleaning Hacks You Shouls Know) भाजी बनवण्यापासून चपाती बनवण्यापर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतात. (Time Saving Kitchen Cleaning Hacks) काही हॅक्स वापरून तुम्ही किचन काऊंडर अगदी सहज स्वच्छ करू शकता. (Hacks To Sparkling Kitchen Counter)
1) उकळत्या पाण्याचा वापर करा
किचन काऊंटर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. ज्यामुळे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होईल. हे घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त एका भांड्यात गरम पाणी भरून घ्या. नंतर डिश डिटर्जेंटचे काही थेंब घालून पाणी उकळवून घ्या. पाणी उकळवल्यानंतर किचन काऊंटर स्वच्छ करा. स्वच्छ कोरड्या कापडाचा किचन काऊंडर स्वच्छ करण्यासाठी वापर करा. पाणी काऊंटरवर घाला नंतर ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीने घाण स्वच्छ करा.
2) बोरॅक्स पावडरने किचन काऊंटर स्वच्छ करा
किचन काऊंटर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बोरॅक्स पावडरचा वापर करू शकता. यामुळे काऊंटरवर आलेला काळेपणा दूर होईल. बोरॅक्स पावडर क्लिनिंगसाठी फायदेशीर ठरते. किचन काऊंटर स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. सगळ्यात आधी बाऊलमध्ये २ ते ३ चमचे बोरॅक्स पावडर घ्या, त्यात थोडं व्हिनेगर मिसळा या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिसळा नंतर ही पेस्ट काऊंटर टॉपरला लावा. ही पेस्ट काही वेळा रगडल्यानंतर ऑब्जॉर्ब होईल. शेवटी किचन काऊंटर व्यवस्थित स्वच्छ करा.
3) टुथपेस्ट
जर किचन काऊंटरवर हळदीचे डाग लागले असतील तर ते साफ करण्यासाठी तुम्ही टुथपेस्टचा वापर करू शकता. हे खूप कमी लोकांना माहीत असते की टुथपेस्टचा वापर करून डाग सहज स्वच्छ करता येता. तुम्ही याच्या मदतीने घराची साफसफाईसुद्धा करू शकता. व्हाईटनिंग टुथपेस्ट घ्या आणि डाग असलेल्या ठिकाणी लावा. जवळपास ५ ते १० मिनिटांनी टुथपेस्ट लावलेली राहू द्या. त्यानंतर ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या.
4) मल्टीपरपज क्लिनरचा वापर करा
किचन काऊंटरवर अन्न चिकटते. या चिकटलेल्या अन्नाचा दुर्गंध येतो. म्हणून ही घाण स्वच्छ करण्यासाठ तुम्ही मल्टीपरपज क्लिनरचा वापर करू सकता. मल्टी परपज क्लिनर एक असं उत्पादन आहे ज्यामुळे सर्व डाग स्वच्छ होतील. काऊंटरवर लागलेलं अन्न काढून टाकण्यासाठी क्लिनरचे काही थेंब शिंपडा, त्यानंतर २ ते ५ मिनिटांनी डाळ स्वच्छ करा. डाग तरीही निघत नसतील तर ही प्रक्रिया दोनवेळा करा.