Join us  

Hairdresser Gives Cat a Trim : १ नंबर! सलूनवाल्यानं मांजरीचा जबरदस्त हेअरकट केला, पाहा Cute लूक, Video  होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:13 AM

Hairdresser Gives Cat a Trim : इंस्टाग्रामवर मांजरींच्या खोडकरपणाचे आणि नेटिझन्सच्या करामतींचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ कधीकधी तुमचा पूर्ण दिवस आनंदात जाण्याचं कारण ठरतात.  पाळीव प्राण्यांची आवड अनेकांना असते. अगदीच पाळता नाही आले तरी  पाळीव प्राण्याचे क्यूट व्हिडिओज प्राणीप्रेमी नेहमीच बघतात. (Hairdresser gives cat a trim and netizens can’t handle the cuteness. Video has over 2 million views) प्राण्यांची  खेळल्याशिवाय एकही दिवस जात नाही असेही काहीजण असतात.  घरात इतर कोणीही नसेल तरी पाळीव प्राण्यांची कंपनी ते इन्जॉय करतात. 

इंस्टाग्रामवर मांजरींच्या खोडकरपणाचे आणि नेटिझन्सच्या करामतींचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात.  सध्या सोशल मीडियावर एका मांजरीच्या हेअरकटचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आनंद आल्याशिवाय राहणार नाही. 

बाबौ! ही तर लेडी 'मिस्टर इंडिया', कॅमेरा समोरच उभ्या उभ्या गायब झाली पोरगी, पाहा व्हिडिओ

या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं “मी हा व्हिडिओ लूपवर खूप वेळा प्ले केला आहे,” दुसर्‍याने कमेंट केली. "हे खूप सुंदर आहे." तिसरा म्हणाला. “हे मांजर माझ्यापेक्षा चांगले बसले आहे, जेव्हा मी माझे केस काढतो तेव्हा इतका  शांतपणे बसत नाही.,” तर काही युजर्सनी  घरातल्या मांजरींच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया