सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एका रेडीट युजरनं नखं नसलेल्या बोटांचा फोटो सोशल मीडियावर तो फोटो शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये दर्शवलेली स्थिती एक आजार आहे. या आजाराचं नाव एनोनिजिया कोजेनिटा आहे. युनायटेड स्टेट्स नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) नुसार, एनोनिशिया कोजेनिटा (Anonychia congenita) ही एक अत्यंत दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे.
हा एकप्रकारचा सिंड्रोम असतो. नॉनसिंड्रोमिक एनोनिशिया आंशिक असतो म्हणजे काही नखं असतात किंवा पूर्ण असतो की नखं अजिबात नसतात. जन्मत:च नखं नसणं आणि न येणं ही अशी एक स्थिती आहे.
(Hand without nails viral image of a man hand without nails shocks the internet)
या फोटोत नखं नसलेली बोटे दिसत आहेत. ही स्थिती एखाद्या व्यक्तीच्या नखे आणि बोटांवर परिणाम करते. युनायटेड स्टेट्स नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) नुसार, एनोनिशिया (नखांची अनुपस्थिती) ही एक अत्यंत दुर्मिळ जन्मजात विसंगती आहे. या विसंगतीवर सध्या कोणतेही उपचार नाहीत. कृत्रिम नखं लावणं हा यावरचा एकमेव उपचार असू शकतो.