Join us

Happy Daughters Day : डॉटर्स डे च्या दिवशी लाडक्या लेकीसाठी बिग बींची भावूक पोस्ट; पोस्ट पाहताच श्वेता बच्चनचा भन्नाट रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 14:27 IST

Happy Daughters Day : आज डॉटर्स डे निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी सर्व मुलींसाठी खूप गोड संदेश लिहिला आहे.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनी या खास दिवशी श्वेतासोबतचा स्वतःचा आणखी एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे - प्रत्येक दिवस आपल्या मुलीला समर्पित. हॅप्पी डॉटर्स-डे

(Image credit- India Today)

आज राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जात आहे.  सोशल मीडियावर सिलिब्रिटींनी आपल्या लाडक्या लेकींना शुभेच्छा देत पोस्ट शेअर केल्या आहेत. अनेक दशकांपासून सुपरहिरो म्हणूनही ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियामध्येही सुपरस्टारपेक्षा कमी नाहीत. 

प्रसंग कोणताही असो, ते सोशल मीडियावर येतात आणि त्यांच्या चाहत्यांशी आणि अनुयायांशी याबद्दल बोलतात. आज डॉटर्स डे निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी सर्व मुलींसाठी खूप गोड संदेश लिहिला आहे. आपली मुलगी श्वेता बच्चन नंदासोबत स्वतःचा एक फोटो शेअर करताना त्याने लिहिले - हॅप्पी डॉटर्स डे. मुली सर्वोत्तम असतात-अमिताभ बच्चन.

बिग बींनी आपली मुलगी श्वेतासोबत पोस्ट केलेल्या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये बिग बींनी पुढे लिहिले आहे की जर मुली नसत्या तर जग, समाज, संस्कृती सर्व अनुपस्थित असते. या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांच्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अमिताभ बच्चन यांनी या खास दिवशी श्वेतासोबतचा स्वतःचा आणखी एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे - प्रत्येक दिवस आपल्या मुलीला समर्पित. हॅप्पी डॉटर्स-डे ....  श्वेता बच्चननेही अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी देखील अमिताभ बच्चन यांनी कन्यादिनाच्या निमित्ताने त्यांची मुलगी श्वेतासोबत फोटोंचा एक गोंडस कोलाज फोटो शेअर केला होता.  

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडव्हायरल फोटोज्