मुंबई लोकलमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा कलाकाराचा प्रयत्न सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स मनापासून या प्रयत्नांबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. भिंत आणि कॅनव्हासवर चित्रे तयार करणारी मुंबईची कलाकार अलिशा विवेक आंग्रे हिनं ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या आजीचे चित्र काढून त्यांना आश्चर्यचकित केले. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर सर्वांचं मन जिंकत आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अलीशा बसली होती आणि तिने काही सेकंदात समोर बसलेल्या आजीचे स्केच काढल्याचे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो. (Grandmother was sitting in the local train then a girl did a shocking thing)
अलिशाने स्वतः हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही महिला त्याच ठिकाणी जात होती जिथे मी जात होते. त्या माझ्या बुकमध्ये वारंवार डोकावत होत्या. त्या खूप गोड होत्या आणि माझ्याशी बोलत राहिल्या आणि मी चित्र काढल्यानंतर त्यांनी माझे आभार मानणे थांबवले नाही.'
मी सर्व काही रेकॉर्ड करू शकलो नाही, परंतु काही व्हिडिओ बनवले. मुंबई लोकल तुम्हाला प्रत्येक वेळी आश्चर्यचकित करते. खूप छान लोक भेटतात. मी ट्रेनमध्ये माझ्या कलेशी संबंधित काही गोष्टी घेऊन जाते. एखादी कल्पना तुमच्या मनात कधी येते आणि एखाद्याला हसण्याचे कारण देते हे तुम्हालाही कळत नाही.
पठ्ठ्यानं बाईकवर बायकोबद्दल 'असं' काही लिहिलं; व्हायरल फोटो पाहून पोट धरून हसाल!
मुंबईच्या लोकांसोबत राइड करणाऱ्या अलिशाने एक व्हिडिओ शूट केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. प्रवास करत असलेल्या एका आजीकडे तिची नजर पडली आणि मग तिने चित्र काढायचे ठरवले. आजीच्या आनंदी चेहऱ्यानं अलीशाचे लक्ष वेधून घेतले. हा अनुभव तिने कॅप्शनमध्ये शेअर केला आहे.