Join us  

Karwa Chauth 2021 : 'हिंदू परंपरांना बदनाम का करताय?' करवाचौथ साजरी करतंय समलिंगी जोडपं, डाबरच्या त्या जाहिरातीनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 5:24 PM

Karwa Chauth 2021: या जाहिरातील दोन तरूणी करवा चौथच्या आधी तयारी करताना दिसून येत आहेत. ज्यात एक महिला दुसऱ्या महिलेच्या त्वचेवर ब्लिच लावत आहे.

सण उत्सवाचा हंगाम सुरू झाला आहे.  सध्या लहान मोठे प्रत्येक ब्रॅण्डस आपल्या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी तसंच लोकांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या जाहिराती प्रदर्शित करतात. सुप्रसिद्ध ब्रॅण्ड डाबरनंही अशीच एक जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही जाहिरात करवा चौथच्या (karva chauth)  आधी रिलिज करण्यात आली होती. डाबरच्या (Dabur) क्रिम गोल्ड ब्लीचच्या जाहिरातीत समलिंगी जोडपे करवा चौथ साजरी करताना दिसून येत आहे.

ही जाहिरात शेअर केल्यापासून  सोशल मीडियावर  गट तयार झाले आहेत. करवा चौथच्या दिवशी डाबरची नवी जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या जाहिरातीवर युजर्सनी संतापजनक कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटिझन्सपैकी काहीजणांनी याला प्रगतीशील असल्याचं म्हटलंय तर अनेकांनी  नापसंती दर्शवली आहे. 

या जाहिरातील दोन तरूणी करवा चौथच्या आधी तयारी करताना दिसून येत आहेत. ज्यात एक महिला दुसऱ्या महिलेच्या त्वचेवर ब्लिच लावत आहे. या सणाचं महत्व आणि कारणांवरही त्या चर्चा करताना दिसतात. याचवेळी एक दुसरी महिला यांच्या चर्चेत सहभागी होते आणि त्यांना करवा चौथसाठी साडी देते.  

जाहिरातीच्या शेवटी  दोन महिला पारंपारिक चाळणी आणि त्यासमोर पाण्यानं सजवलेली थाळी ठेवून एकमेकांना बघतात. यामाध्यमातून ते एकमेकांचे लाईफपार्टनर असल्याचं दर्शवतात. एका युजरनं वेलडन,  फेम/डाबर!  अशी प्रतिक्रिया दिली आहे.  तर दुसऱ्या युजरनं हिंदू रिती रिवाजांना बदनाम का करताय? असा प्रश्न विचारलाय. तर काहींना सर्वसमावेशक जाहिरात असल्याचं म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :भारतीय उत्सव-सणसोशल व्हायरलसोशल मीडिया